आता बेस्टमध्येही करता येणार रिझर्व्हेशन

104

बेस्ट नेहमी प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या सुविधा घेऊन येत असते. आता अशीच एक सुविधा घेऊन बेस्ट प्रवाशांच्या भेटीला येत आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी बेस्टला असलेली गर्दी, बस थांब्यावर वेळेत न येणा-या बसगाड्यांमुळे प्रवाशांचे कामाचे नियोजनच बिघडते. त्यातून सुटका करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ओला, उबर या मोबाइल अॅप आधारित खासगी टॅक्सी सेवांप्रमाणे बससेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाव्यवस्थापकांची माहिती

बेस्टमधील आसन प्रवाशांना आरक्षित करता येणार आहे. ही सेवा दोन हजार वातानुकूलित बसद्वारे उपलब्ध केली जाणार आहे. येत्या चार ते सहा महिन्यांत ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. ही सेवा दोन हजार वातानुकूलित बससाठी उपलब्ध केली जाईल. या बस एकमजली वातनुकूलित असतील. त्याही टप्प्याटप्प्यात दाखल होणार असल्याचे, लोकेश चंद्र यांनी सांगितले.

प्रवाशांचा प्रवास सुकर होणार

मोबाईल अॅपद्वारे प्रवाशांना बसचा मार्ग, वेळ त्या मार्गावर आणखी किती बस सेवा असतील, याची माहिती समजू शकले. याचे नियोजन सुरु असून चार ते सहा महिन्यांत ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवासही सुकर होणार आहे. यामध्ये आसन आरक्षित केलेले प्रवासीच प्रवास करु शकणार आहेत. खासगी टॅक्सीप्रमाणे सेवा देताना, वातानुकूलित बस चालवल्या जातील. या बसचे भाडे सध्याच्या वातानुकूलित बेस्ट बसपेक्षाही अधिक असणार आहे.

( हेही वाचा: “मी धर्मांध नाही धर्माभिमानी आहे”…मनसेचा नवा टिझर पाहिलात का? )

900 दुमजली बस

बेस्ट उपक्रमाने मुंबई विमानतळासाठीही एक्सप्रेस सेवा सुरु केली आहे. ही बस सेवा आता 24 तास असणार आहे. याशिवाय विजेवर धावणा-या 900 दुमजली बसही ऑगस्टपासून टप्प्याटप्याने दाखल होणार आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.