Ganesh Festival : शासनाकडून सर्वोत्कृष्ट मूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन; जाणून घ्या काय आहेत निकष…

163
Ganesh Festival : शासनाकडून सर्वोत्कृष्ट मूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन; जाणून घ्या काय आहेत निकष...
Ganesh Festival : शासनाकडून सर्वोत्कृष्ट मूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन; जाणून घ्या काय आहेत निकष...

मुंबईतील गणेशोत्सव हा सर्वांचा उत्साहाचा विषय आहे. (Ganesh Festival) याच गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून सर्वोत्कृष्ट मूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील गणेश मंडळांना उत्तेजन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस हे ३ लाख रुपयांचे ठेवण्यात आले असून दुसरे बक्षीस हे २ लाख रुपये असणार आहे. तसेच 50 गणेश मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येईल, तर उत्तेजनार्थ म्हणून 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि शीतल म्हात्रे यांनी दिली. मागील वर्षी राज्यशासनाने सर्व गणेशोत्सवाचे निर्बंध उठवण्यात आले. त्यामुळे यंदा देखील गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाईल, असे नरेश म्हस्के आणि शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – BMC 6th & 7th Pay Commission : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या इतर संवर्गातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची केली निराशा)

पर्यावरणपूरक मूर्ती आणि पर्यावरणपूरक सजावट आवश्यक

या स्पर्धेचे फॉर्म हे शिवसेनेच्या शाखेत उपलब्ध असल्याची माहिती देखील या वेळी त्यांनी दिली आहे, तर 16 ते 21 सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेसाठी नावनोंदणी केली जाईल. (Ganesh Festival) धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या गणपती मंडळांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता होणार आहेत. तसेच ज्या गणपती मंडळांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेतली आहे, त्यांना देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल. या स्पर्धांसाठी नियम आणि अटी लागू करण्यात येतील. या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट या निकषांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये थर्मोकोल किंवा प्लास्टिक विरहित गणेश स्पर्धांचे देखील मूल्यांकन केले जाईल. तसेच ‘पाणी वाचवा’, ‘मुलगी वाचवा’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ यांसारख्या समाजप्रबोधन करणाऱ्या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय पुढील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने सजावट, देखावा यांचा देखील या मूल्यांकनासाठी समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती नरेश म्हस्के आणि शीतल म्हात्रे यांनी दिली.

विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजनावर देखील या स्पर्धेचे मूल्यांकन केले जाईल. यामध्ये रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे यांचा समावेश करण्यात आला आहे. (Ganesh Festival)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.