मुंबईतील बहुतांश ठिकाणी बेस्टमार्फत वीजपुरवठा ( BEST Electricity Department) केला जातो. परंतु मागील काही महिन्यांचे वीजबिल अपडेट नसल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ शकतो. त्यामुळे ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट SMS वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने परिपत्रक जारी केले आहे.
बेस्ट उपक्रमाचे आवाहन
बेस्ट उपक्रमाच्यावतीने विजबिलाबाबतचे लघुसंदेश (SMS) कोणत्याही भ्रमणध्वनी क्रमांकावरुन न पाठविता “BESTSM” द्वारे पाठविले जातात. जर आपणास विजबिलांबाबत अथवा वीज पुरवठा खंडित करण्याबाबतचा SMS “BESTSM” च्याऐवजी इतर कोणत्याही अन्य क्रमांकावरुन आल्यास व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देऊन संपर्क साधण्यास सांगितल्यास कृपया अशा प्रकारच्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये अशा प्रकारे आपणास ऑनलाईन व्यवहार करण्यास प्रवृत्त करून आपली फसवणूक केली जाऊ शकते असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्यावतीने सर्व वीजग्राहकांना करण्यात आले आहे.
( हेही वाचा : इलेक्ट्रिक बस निविदा नव्याने काढण्याच्या ‘बेस्ट’ला सूचना; मात्र टाटा मोटर्स अपात्रचं! )
तसेच संबंधित प्रभागांसाठी बेस्ट उपक्रमाचे ग्राहक सेवा कॉलिंग क्रमांक बेस्ट उपक्रमाच्या www.bestundertaking.com वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
कोणत्याही मदतीसाठी अथवा मार्गदर्शनासाठी वीजग्राहक या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तुमचा पासवर्ड किंवा ओटीपी कोणालाही देऊ नका व फसवणूक होण्यापासून स्वत:ला वाचवा असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community