मुंबईत रविवारी कर्नाक पूलाचे पाडकाम करण्यासाठी तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम करण्यासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या २७ तासांच्या मेगाब्लॉकमुळे सीएसएमटी-भायखळा आणि वडाळादरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात आली होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने नियमित गाड्यांबरोबरच काही अतिरिक्त गाड्यांचे नियोजन केले होते. यामुळे बेस्ट उपक्रमाला ३ लाख १७ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न एका दिवसात मिळाले.
( हेही वाचा : पेन्शनधारकांसाठी SBI बॅंकेने सुरू केली नवी सुविधा; एका व्हॉट्सअॅप मेसेजवर होतील सर्व कामे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…)
बेस्ट उपक्रमाला अतिरिक्त ३ लाखांचे उत्पन्न
मुंबईत १९ नोव्हेंबर रात्री ११ वाजल्यापासून ते २१ नोव्हेंबरच्या पहाटे २ वाजेपर्यंत कर्नाक पूलाचे पाडकाम हाती घेण्यात आले होते. यादरम्यान लोकलसेवा सीएसएमटी ते मस्जिद बंदर दरम्यान पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. तब्बल १ हजार ९६ लोकल फेऱ्या बंद असल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रवाशांनी अतिरिक्त गाड्या सोडण्याची मागणी मध्य रेल्वेने बेस्ट उपक्रमाकडे केली होती.
१९ नोव्हेंबरला १७, तर २० नोव्हेंबरला ६८ जादा बसगाड्या सोडण्यात आल्या. दोन दिवसांमध्ये जादा गाड्यांच्या एकूण ४७१ फेऱ्या झाल्या. या माध्यमातून प्रवाशांना तब्बल ३ लाख १७ हजार ६९ रुपये एवढे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community