चौमाही ड्युटी शेड्युलमुळे कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाबाबत बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे. याआधी सुद्धा कर्मचारी संघटनांना या ड्युटी शेड्युलबाबत नाराजी व्यक्त केली होती.
( हेही वाचा : Post Office Scheme : केवळ ३९९ रुपयांमध्ये पोस्टाकडून मिळेल १० लाखांचा अपघाती विमा! जाणून घ्या संपूर्ण योजना )
बेस्ट कामगार सेनेचे पत्र
१ जुलै २०२२ पासून लागू झालेल्या नव्या ड्युटी शेड्युलनुसार बसचौक्यांची दुरावस्था, विश्रांती घेण्यासाठी पुरेशी सुविधा, उपहारगृहाची योग्य सोय उपलब्ध नसल्यामुळे कर्मचा-यांना शारीरिक तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच बहुतांश ड्युट्यांमधील रिडनेसची वेळ वाढवल्यामुळे बऱ्याच सिनिअर कर्मचाऱ्यांना याचा त्रास होतो असे बेस्ट कामगार सेनेने आपल्या लिखित पत्रात स्पष्ट केले आहे.
ड्युट्या पूर्ववत कराव्यात
या शेड्युलच्या अंमलबजावणीमुळे उपक्रमाच्या आर्थिक उत्पनात वाढ न होता कर्मचा-यांचा ओव्हरटाईम वाढल्यामुळे एका बाजूने उपक्रमाचे आर्थिक नुकसान होत आहे. कर्मचारीवर्ग सुद्धा त्रस्त आहे. परिणामतः हे शेडयुल असेच पुढे राबविल्यास उपक्रम आणि कर्मचारी यांना ते फायदेशीर ठरणार नाही. या शेड्युलमुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीत वाढ झाल्याचे दिसून येते, तरी याबाबत सकारात्मक विचार करून विद्यमान शेड्युल मधील त्रुटी दुरूस्त करून मागील शेड्युलप्रमाणे ड्युट्या पूर्ववत कराव्यात याबाबतची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत अशी विनंती बेस्ट कामगार सेनेने उपक्रमाला केली आहे.