बेस्ट उपक्रमाने (BEST) डिसेंबर महिन्यात चलो अॅप (Chalo App) मुंबईकरांच्या सेवेत दाखल केले. त्यानंतर आता बेस्टने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड NCMC (One Nation One Mobility Card) सेवा सुरू केली आहे. प्रवाशांना रेल्वे किंवा मेट्रोने प्रवास करताना रांगेत उभे राहण्याची गरज लागणार नाही. या सामायिक कार्डामुळे प्रवासी बेस्ट, मेट्रो, लोकल अशा तिन्ही मार्गांवर प्रवास करू शकणार आहेत.
( हेही वाचा : लालपरी पुन्हा धावण्यास सज्ज, वाचा ही महत्त्वाची बातमी! )
सार्वजनिक परिवहन उपक्रमांसाठी एकच तिकीट असावी यासाठी ऑक्टोबर २०२० पासून चाचणी घेतली जात होती. आता मात्र हे कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहे. देशभरात ज्या भागात या सामायिक कार्डची सुविधा उपलब्ध असेल त्याठिकाणी प्रवासी हे कार्ड वापरू शकतात असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. या कार्डमुळे आता सुटे पैसे, तिकीटासाठी रांग लावण्याची आता गरज नाही.
You can now buy the BEST NCMC card from any of the 27 bus depots in Mumbai. https://t.co/H0KuuCOjXP pic.twitter.com/aKbuc4pKDz
— Chalo (@chaloapp) April 13, 2022
कार्डची किंमत
या कार्डाची किंमत १०० रुपये आहे. १०० रुपयाला विकत घेऊन त्यानंतर प्रवासी आपल्या सोयीनुसार या कार्डमध्ये रिचार्ज करू शकतात.
कार्ड कुठे मिळणार
प्रवाशांना हे कार्ड मुंबईतील २७ बेस्ट आगारांमध्ये उपलब्ध करून दिले जाईल ही माहिती ट्वीट करत बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना दिली आहे.
कार्डचा इतर उपयोग
या कार्डचा फायदा वीजबिल, उपहारगृहांमधील बिले, शॉपिंग करण्यासाठी सुद्धा होणार आहे.
रिचार्ज कुठून कराल
या सामायिक कार्डचे रिचार्ज तुम्ही ऑनलाइन किंवा बेस्टच्या कंडक्टरमार्फत करू शकता.
कार्ड रीडर
रिंग रूटवर धावणाऱ्या एसी बससाठी ६ रुपये आणि नॉन एसी बससाठी ५ रुपये भाडे आकारले जाते. बसेसमध्ये रीडर मशिन्स बसवण्यात येतील NCMC (One Nation One Mobility Card) कार्ड आणि चलो मोबाइल अॅपवर, बेस्ट कार्डचा वापर करत प्रवासी तिकीट काढू शकतात. टॅप केल्यावर प्रवाशांना लगेच तिकीट काढता येणार आहे.
Join Our WhatsApp Community