गणेशोत्सवादरम्यान ‘BEST’ कडून ‘निलांबरी’ बससेवा! काय आहेत वैशिष्ट्य?

133

देशात सर्वत्र 31 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी बेस्टने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते गिरगाव चौपाटी दरम्यान नीलांबरी नावाने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ओपन डेक असलेल्या या डबल डेकर बस असणार आहे. या बसद्वारे मुंबईकरांसह इतरांना देखील मुंबईतील ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांचा आनंद लुटता येणार आहे.

(हेही वाचा – अमृत महोत्सवाची सामूहिक शक्ती देशातच नाही तर जगभरात, मोदींकडून भारतीयांचे कौतुक)

किती असणार भाडं

बेस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवादरम्यान या नीलांबरी बसेस रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत चालवण्यात येणार आहेत. दर तासाला एक बस असणार असून ही सेवा मुंबईतील संग्रहालयापासून सुरू होईल आणि त्याच मार्गाने गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरीन ड्राइव्ह, चर्चगेट, गिरगाव चौपाटी, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, मुंबई सेंट्रल, भायखळा, जिजामाता उद्यान आणि लालबागमार्गे संग्रहालयाकडे परत येईल. या बसचे भाडे ओपन डेकच्या वरच्या भागासाठी 150 रुपये आणि खालच्या भागात बसण्यासाठी 75 रुपये असणार आहे.

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठा उत्सव

गेल्या वर्षी 2020 सालापासून कोरोना महामारीमुळे लादलेल्या निर्बंधातून मुक्ती झाल्यानंतर 31 ऑगस्टपासून मुंबईकर मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करणार आहेत. महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध 2 एप्रिल 2022 रोजी उठवण्यात आले. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने गणपतीनिमित्त शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण विभागाने 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर यादरम्यान शाळा आणि महाविद्यालयांना एकूण पाच दिवस सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, गणेशोत्सवात मुंबईशिवाय कोकणात लाखो लोक दाखल होत असतात. राज्य सरकारने रस्त्याने जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल टॅक्स माफ केला आहे. यादरम्यान रेल्वे गणपती विशेष गाड्याही चालवते. गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने आतापर्यंत 230 गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेनेही सुमारे 60 गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.