‘बेस्ट’च्या सामायिक कार्डाला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद

बेस्ट उपक्रमाने 13 एप्रिलपासून प्रवाशांच्या सोयीसाठी ‘एकच सामायिक कार्ड’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड One Nation One Mobility Card) ही सेवा सुरू केली. रोख रकमेचा वापर टाळता यावा तसेच रेल्वे, मेट्रोने प्रवास करताना एकच सामायिक कार्ड असावे जेणेकरून प्रवाशांना तिन्ही मार्गांवर प्रवास करणे सोयीचे होईल हा यामागील मुख्य हेतू होता. या कार्डचा वापर उपहारगृहात, शॉपिंग करताना सुद्धा करता येतो. परंतु या कार्डला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

केवळ ५८ कार्डची विक्री

१३ एप्रिलला या कार्डची सुविधा सुरू झाली. त्यानंतर पुढील एका आठवड्यात केवळ ५८ कार्डची विक्री करण्यात आली अशी माहिती उपक्रमाने दिली आहे. हे सामायिक कार्ड १०० रुपयांमध्ये बेस्टच्या मुंबईतील सर्व आगारांमध्ये उपलब्ध आहे. या कार्डला मुंबईकरांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. या कार्डचा उपयोग करून डिजीटल व्यवहार व प्रवास करण्यास प्राधान्य मिळावे याकरता सचिन तेंडुलकर, अनिल कपूर यांच्या मदतीने बेस्टमार्फत ‘पुढे चला’ अभियान राबवण्यात येत आहे.

प्रवाशांना हे कार्ड मुंबईतील २७ बेस्ट आगारांमध्ये उपलब्ध करून दिले जाईल ही माहिती ट्वीट करत बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना दिली होती. या कार्डचा फायदा वीजबिल, उपहारगृहांमधील बिले, शॉपिंग करण्यासाठी सुद्धा होणार आहे. या सामायिक कार्डचे रिचार्ज तुम्ही ऑनलाइन किंवा बेस्टच्या कंडक्टरमार्फत करू शकता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here