बेस्टचे नवे विशेष मार्ग! मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा

162

मुंबईमध्ये नवे मेट्रो मार्ग सुरू झाले असून या मार्गांपर्यंत मुंबईकरांना सोयीने प्रवास करता यावा यासाठी बेस्ट उपक्रमाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. २१ जानेवारी २०२३ पासून मुंबईतील प्रवाशांच्या सोयीकरिता मुंबई उपनगरामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने दहिसर आणि गुंदवली अंधेरी (पुर्व) दरम्यान मेट्रो रेल -७” सुरु करण्यात आलेली असून दहिसर आणि एसिक नगर-अंधेरी (पश्चिम) दरम्यान मेट्रो रेल-२ सुरु करण्यात आलेली आहे. प्रवाशांनी या दोन्ही मेट्रो रेल सेवांना अतिशय समाधानकारक असा प्रतिसाद दिलेला आहे.

( हेही वाचा : Gita GPT: गुगल इंजिनियरने तयार केलं AI Chatbot गीता GPT; सोडवली जाणार तुमची प्रत्येक समस्या)

काही प्रवाशांनी या मेट्रो सेवांचा लाभ घेण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून काही अतिरिक्त बसची मागणी केली आहे. विशेषतः दहिसर मेट्रो रेल्वे स्थानकाकडे येणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात मिरा रोड येथून येत असून या प्रवासाकरिता त्यांना बेस्ट उपक्रमाच्या सेवांवर अवलंबून रहावे लागत असल्याचे नमूद केले आहे. प्रवाशांच्या मागणीला अनुसरून बेस्ट उपनाच्यावतीने सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ पासून दहिसर मेट्रो स्थानक आणि मिरा रोड रेल्वे स्थानक (पूर्व) दरम्यान काशिमिरा, सिल्बर पार्क, जम्मू काश्मीर बैंक मार्ग नवीन विशेष बसमार्ग क्र. पीपीएस-१ (नॉन स्टॉप ) सुरू करण्यात येत आहे. या बसमार्गाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

  • विशेष बसमार्ग क्र. पीपीएस-१ (नॉन स्टॉप ) – दहिसर मेट्रो स्थानक – मिरा रोड रेल्वे स्थानक (पूर्व)
  • बसचा प्रवासमार्ग – दहिसर चेकनाका – काशिमिरा – सिल्वर पार्क – जम्मू काश्मीर बॅंक – मिरा रोड रेल्वे स्थानक (पूर्व)

वेळापत्रक

  • मागठाणे आगार/दहिसर मेट्रो स्थानक – पहिली बस ७ वाजता आणि शेवटची बस रात्री १० वाजता सुटेल.
  • मिरा रोड रेल्वे स्थानक पूर्व – पहिली बस सकाळी ७.४५ वाजता आणि शेवटची बस रात्री २२.४५ वाजता सुटेल.
  • या दोन्ही बस गाड्यांचे १५ मिनिटांच्या अंतराने प्रस्थानांतर होईल.

भाडेदर

या विशेष बससेवेसाठी २५ रुपये भाडेदर आकारण्यात येईल. तरी सर्व प्रवाशांना मेट्रो सेवेबरोबरच बेस्ट उपक्रमाच्या या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.