‘बेस्ट’कडून विद्यार्थ्यांना सवलतीत ‘बसपास’! जाणून घ्या दर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता स्मार्ट कार्ड तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे मोफत प्रवासाची सुविधा बेस्ट उपक्रमाने उपलब्ध करून दिली आहे. परंतु, खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांकरिता अशा प्रकारची कोणतीही सुविधा नव्हती. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार खाजगी शाळांमधील आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता बेस्ट उपक्रम विशेष सवलतीचा बसपास देणार आहे. या नवीन बसपास योजनेअंतर्गत (वातानुकूलित / विना वातानुकूलित) सुविधा बेस्ट उपक्रमाद्वारे देण्यात येत आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांनो, ‘बेस्ट’ आठवणी ‘बेस्ट’कडे शेअर करा!)

बसपासाचे दर

  • इयत्ता ५ वी पर्यंत रु.२००/-
  • इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंत रु.२५०/-
  • इयत्ता ११ वी १२ वी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता रु.३५०/-

( हेही वाचा : ‘बेस्ट’मध्ये कायमस्वरुपी कर्मचारी भरती करणे आवश्यक)

बेस्ट उपक्रमाचे आवाहन 

सदर सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ऑनलाइन म्हणजेच अ‍ॅपद्वारे तसेच ऑफलाईन देखील अर्ज करु शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना आगारात येण्याची गरज भासणार नाही. या योजनेची संपूर्ण माहिती बेस्ट उपक्रमाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी सदर सवलतीच्या बसपास योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात येत आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here