स्वस्त मस्त BEST! आता ३१ ऑगस्टपर्यंत करता येणार १ रुपयांत बसप्रवास; योजनेला मुदतवाढ

166

बेस्टच्या महापालिकाकरणाचा आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त बेस्ट उपक्रमाने चलो अ‍ॅपवर एक रुपयात पाच फेऱ्यांचा बस प्रवास ही योजना सुरू केली होती या योजनेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला. जवळपास १ लाखांहून अधिक नागरिकांना या योजनेअंतर्गत बेस्ट बसने प्रवास केला. म्हणूनच बेस्टने या योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टने डिरुजिटल तिकीट प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी चलो अ‍ॅप सेवेत आणले होते.

( हेही वाचा : स्वस्त मस्त BEST! मुंबईत फक्त १ रुपयात बस प्रवास)

प्रवाशांच्या वाढच्या प्रतिसादामुळे मुदतवाढ 

बेस्ट १५ ऑगस्टपर्यंत चलो अ‍ॅपचा वापर करून प्रथमच प्रवास करणाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने एक रुपया भरून सात दिवसात पाच प्रवासाची सुविधा दिली होती. यास उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या योजनेत वाढ करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. बेस्टच्या या योजनेअंतर्गत प्रवासी कोणत्याही मार्गावर एसी किंवा साध्या बसने प्रवास करू शकतात. बेस्टच्या चलो अ‍ॅपचा वापर करून सुमारे साडेतीन लाख प्रवासी एका दिवसात तिकीट घेत होती परंतु काही दिवसातच आता ही संख्या चार लाखांवर गेली आहे. या अ‍ॅपमध्ये शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगासह, पत्रकांराना विशेष सवलती आहेत. तर प्रवाशांना सुद्धा विविध सवलती या अ‍ॅपद्वारे दिल्या जातात.

२२ लाख मुंबईकर प्रवाशांनी डाऊनलोड केले चलो अ‍ॅप 

चलो अ‍ॅपद्वारे प्रवाशांना डिजिटल तिकीट काढता येते शिवाय आपली बस ट्रॅक करता येते, बसमध्ये बसायला जागा उपलब्ध आहे की नाही याची माहिती सुद्धा प्रवाशांना या अ‍ॅपद्वारे मिळते. बेस्टने २१ डिसेंबर २०२१ पासून या अ‍ॅपची सुविधा सुरू केली आहे. सध्या सुमारे २२ लाख मुंबईकर प्रवाशांनी चलो अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.