बेस्टचा डिजिटल प्रवास! लवकरच ‘या’ मार्गांवर धावणार नव्या प्रिमियम बस

मुंबईत लवकरच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते नवी मुंबईतील खारघर या मार्गावर बेस्टची प्रिमियम बससेवा सुरू होणार आहे. डिसेंबरमध्ये बेस्ट उपक्रमाने ठाणे ते बीकेसी अशी लक्झरी बससेवा सुरु केली. या सेवेला सध्या प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

( हेही वाचा : ५० हजारात थायलंड-बॅंकॉक फिरण्याची सुवर्णसंधी! IRCTC कडून विशेष टूरचे आयोजन)

बेस्ट बसने डिजिटल प्रवास 

ठाणे ते बीकेसी आणि खारघर ते बीकेसी या मार्गांव्यतिरिक्त चेंबूर ते कफ परेड, ठाणे ते पवई या दोन मार्गांवर सुद्धा बेस्टच्या प्रिमियम बसेस सुरू होणार आहेत. खासगी बस, टॅक्सींच्या लोकप्रिय मार्गांचे तपशीलवार सर्वेक्षण केल्यानंतर बेस्ट प्रशासनाने या नव्या मार्गांची निवड केली आहे. प्रवाशांना या बसमधून प्रवास करताना चलो अ‍ॅपच्या माध्यमातून आपली जागा आरक्षित करावी लागणार आहे. या बस संपूर्णरित्या डिजिटल असणार आहेत. बसेसमधील सेवा पूर्णपणे डिजिटल असल्याने, या प्रिमियम बसेसमध्ये बस कंडक्टर नसतील आणि प्रवासी टॅप-इन टॅप-आउट सुविधा वापरू शकतील यासाठी प्रवाशांना चलो कार्डाचा वापर करावा लागेल.

२०० ई-बस सुरू करणार 

येत्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील काही महत्त्वाच्या मार्गांवर २०० ई-बस सुरू करण्याचा बेस्ट प्रशासनाचा मानस आहे. डिसेंबरमध्ये, बेस्टने जानेवारीमध्ये डबलडेकर ई-बस सुरू करणार असल्याचेही जाहीर केले आहे. १४ जानेवारी २०२३ रोजी किमान १० डबलडेकर ई-बस मुंबईत आणल्या जाणार आहेत. परिवहन प्राधिकरणाने पुढील वर्षी जूनपर्यंत ५०० इलेक्ट्रिक वाहनांसह बेस्ट टॅक्सी सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे आणि त्यासाठी आधीच निविदा काढल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here