बेस्ट प्रिमियम सेवा! प्रवाशांना मिळणार लक्झरी सुविधा; बससेवेची ही आहेत वैशिष्ट्ये, असे असतील नवे दर…

96

बेस्ट उपक्रमाची इलेक्ट्रिक प्रिमियम एसी बस येत्या १२ डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पहिली बस ठाणे-वांद्रे कुर्ला संकुल मार्गावर दर अर्ध्या तासाने धावणार आहे. या मार्गावरील प्रिमियम बसचे भाडे वांद्रे कुर्ला संकुल ते ठाणे या मार्गासाठी २०५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. प्रवाशांना चलो मोबाईल अ‍ॅपवरून या बसमधील आसन आरक्षित करता येणार आहे.

( हेही वाचा : मिशन वर्ल्डकप २०२३ : पुढील वर्षात टीम इंडिया खेळणार २८ सामने, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक)

प्रिमियम बससेवेचे वेळापत्रक

ठाणे – वांद्रे कुर्ला संकुल प्रिमियम बस सकाळी ७ ते ८.३० वेळेत दर अर्ध्या तासाने असणार आहे. तर ५.३० ते सायंकाळी ७ या वेळेत दर अर्ध्या तासाने प्रवाशांना या मार्गावर बससेवा उपलब्ध होईल. मधल्या वेळेतील वेळापत्रक बेस्ट उपक्रमाकडून प्रसिद्ध केले जाईल.

चलो मोबाईल अ‍ॅपवरून प्रवाशांना बसमधील आसन आरक्षिक करता येणार आहे. या बसमधून उभ्याने प्रवास करण्यास परवानगी नाही. चलो अ‍ॅपवर या बसचा मार्ग, अपेक्षित वेळ, किती बस धावतील याची संपूर्ण माहिती दिली जाईल.

प्रिमियम बससेवेमार्फत महिनाभर मिळणार सवलत

ठाणे ते वांद्रे कुर्ला संकुल मार्ग

  • ३० दिवसात १० फेऱ्यांचा पास १४४० रुपये
  • ३० दिवसात ३० फेऱ्यांसाठी ३ हजार ८४० रुपये
  • ४५ दिवसात ४५ फेऱ्यांसाठी ५ हजार ४४५ रुपये
  • ९० दिवसात ९० फेऱ्यांसाठी ९ हजार २७० रुपये

वांद्रे स्थानक ते वांद्रे कुर्ला संकुल प्रवास

  • ३० दिवसात १० फेऱ्यांचा पास ३५० रुपये
  • ३० दिवसात ३० फेऱ्यांसाठी ९३० रुपये
  • ४५ दिवसात ४५ फेऱ्यांसाठी १ हजार ३५० रुपये

नव्या बसची वैशिष्ट्य

  • प्रत्येक नव्या बसमध्ये दोन जिने असतील, जुन्या बसमध्ये फक्त एकच जिना होता.
  • नव्या बसमध्ये Digital तिकीटांची सोय असेल.
  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
  • नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे.
  • बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील.
  • दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल.
  • प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.