Electricity Theft बाबत बेस्टची दिखावू कारवाई; दादरच्या केशवसुत उड्डाणपुलाखालील गाळ्यांमधील दिवे पुन्हा उजळले

969
Electricity Theft बाबत बेस्टची दिखावू कारवाई; दादरच्या केशवसुत उड्डाणपुलाखालील गाळ्यांमधील दिवे पुन्हा उजळले

दादर पश्चिम येथील केशवसुत उड्डाणपुलाखाली जागेत स्ट्रीट लाईटमधून होणाऱ्या चोरीच्या प्रकरणाबाबत ‘हिंदुस्थान पोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी धडक कारवाई करून अनधिकृत वीज जोडण्यात तोडून टाकल्या आणि या वायर्स जप्त केल्या. परंतु बेस्टच्या या कारवाईचा धग केवळ दोन दिवसांपुरतीच राहिली आणि जणू काही बेस्ट उपक्रमाचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी आपल्या खिशात असल्याप्रमाणे या फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा बेस्टच्या सार्वजनिक दिव्यांमधून तसेच खांबामधून विजेची जोडणी करून आपल्या धंद्यांवर पांढरा लख्ख प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला. पुलाखालील या भागांमध्ये पोलिस बीट चौकीच्या बाजुला तसेच सर्व गाळ्यांमध्ये या वीज चोरीचा प्रकाश पडलेला असतानाही पोलिसांकडून त्यांना हटकले जात नाही की बेस्ट आणि महापालिकेकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे बेस्टचे अधिकारी विकले गेले का असा सवाल उपस्थित होत आहे. (Electricity Theft)

New Project 2024 06 27T211208.269

(हेही वाचा – Hindustan Post Impact : दादरमधील वीज चोरी बेस्टने पकडली, विजेच्या वायर केल्या जप्त)

दादरमधील केशवसुत उड्डाणपुलाखाली गाळ्यांमध्ये या खुलेआम वीज चोरी होत असल्या बाबतचे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ने १९ जून रोजी प्रकाशित करून हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बेस्टने महापालिकेच्या मदतीने ही कारवाई पार पाडली. त्यामुळे केशवसुत उड्डाणपूलाखालील आणि आसपासच्याचे फेरीवाल्यांकडून खुलेआम होणारा विजेचा वापर रोखण्यात यश आले होते. दादर पश्चिम येथील केशवसुत उड्डाणपुलावरील स्ट्रीट लाईटमधून अनधिकृतपणे विजेच्या जोडण्या घेऊन बिनधास्तपणे फेरीवाले मागील अनेक वर्षांपासून बेस्टच्या विजेचा वापर करत आहे. या स्ट्रीट लाईटसाठी महापालिकेच्यावतीने विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनीला पैसे अदा केले जाते. परंतु या स्ट्रीट लाईटमधून विजेची चोरी होत असताना बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष होत असल्याने या फेरीवाल्यांकडून हॅलोजन आणि पंख्यांचाही वापर केला जात असल्याची बाब ‘हिंदुस्थान पोस्ट’ने दादरमध्ये खुलेआम वीज चोरी या आशयाचे वृत्त प्रकाशित करत बेस्टसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या अनधिकृत वीज चोरीमुळे बेस्टचे आर्थिक नुकसान होत असून हे नुकसान सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या खिशातून बेस्ट वसूल करत असल्याने चोरीमुळे गळतीच्या स्वरुपात होणारे हे नुकसान टाळण्याच्या दृष्टीकोनातून ‘हिंदुस्थान पोस्ट’ने यावर प्रकरणावर प्रकाशझोत टाकला होता. (Electricity Theft)

New Project 2024 06 27T211333.738

(हेही वाचा – Electricity Theft : दादरमध्ये खुलेआम वीज चोरी, बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलाय का फेरीवाल्यांना मोफत वीज वापराचा परवाना?)

हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी बेस्ट उपक्रमाचे मोठे पथक दादर केशवसुत उड्डाणपुलाखाली धडकले आणि त्यांनी येथील प्रत्येक गाळ्यांमध्ये होणारी वीज चोरीच्या जोडण्या तोडून त्याच्या वायर ताब्यात घेतल्या. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी यावेळी वायरसह वीजेचे दिवे आणि अन्य साहित्य जप्त करून येथील सर्व कनेक्शन तोडून टाकले आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालील वायरच्या गुंतागुंतीच्या गाठी सोडवण्यात आल्या आहेत, त्यामुळे येथील प्रत्येक गाळा आता स्वच्छ दिसून आला होता. परंतु बुधवारपासून केलेल्या या कारवाईची धग केवळ तीन ते चार दिवस राहिली. त्यानंतर रविवार,सोमवारपासून पुन्हा दिवे लागायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा नव्याने वायर्स मागवून विजेचे कनेक्शन जोडली गेली आहेत. त्यामुळे प्रत्येक गाळ्यांमध्ये आता विजेचे दिवे उजळून निघाले आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांना चोरीच्या विजेचे कनेक्शन देण्यामागे फेरीवाल्यांची ताकद मोठी असल्याचे दिसून येत आहे. ज्याप्रमाणे व्याजाने पैसे देणारे सावकार असतात, त्याप्रमाणे विजेचे कनेक्शन देणारे सावकारही दादरच्या या फेरीवाल्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे. (Electricity Theft)

New Project 2024 06 27T211455.826

फेरीवाल्यांमधील तेथील संवादानुसार, बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्यांनी विजेचे कनेक्शन तोडले आहे, आता त्यांचे मान राखला असून आता पुन्हा कनेक्शन जोडली जातील. त्यासाठी बेस्टला घाबरण्याचे कारण नाही. बेस्टचे अधिकारी आपले करणार नसून कारवाई केल्यानंतर काही दिवस आपण अंधारात व्यवसाय केला आहे, आता आपण दिवे लावू शकतो,असे फेरीवाल्यांकडून ऐकायला मिळत आहे. मुळात केशवसुत उड्डाणपुलाखालील फेरीवाले हे रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या परिसरात असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेचे आहेत. परंतु महापालिका त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि चोरीची वीज वापरुन बेस्टचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या फेरीवाल्यांना बेस्ट अभय देत असल्याचे दिसून येत असल्याने लोकांच्या मनात पुन्हा एकदा या कारवाईच्या नौटकींच्या चर्चाच ऐकायला मिळत आहेत. (Electricity Theft)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.