बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी अखेर मिळणार; BMC ने देऊ केलेल्या निधीपैकी ५० टक्के रक्कम राखीव ठेवणार

3493
Jain Temple Action : अखेर संबंधित सहायक आयुक्ताची बदली
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

तोट्यात चाललेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिकेच्यावतीने १ हजार कोटी रुपये देण्याची घोषणा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केल्यानंतर प्रत्यक्षात हा निधी देण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या १ हजार कोटी रुपयांच्या निधीपैकी शंभर कोटी रुपयांच्या रकमेचा पहिला हप्ता मागील आठ दिवसांपूर्वी देण्यात आली आहे. मात्र, या एकूण एक हजार पैकी तब्बल ५०० कोटी रुपयांचा निधी हा केवळ बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे महापालिकेच्या या निधीमुळे मागील अनेक वर्षांपासून सेवानिवृत्त झालेले बेस्टचे कर्मचारी जे ग्रॅज्युएटीसह इतर भत्त्यांकडे डोळे लावून बसले आहे, ती अडचण आता दूर होणार आहे. (BMC)

(हेही वाचा – राज ठाकरेंनी अभ्यास करावा, मग बोलावे; Ashish Shelar यांची टीका)

बेस्ट उपक्रमांची आर्थिक परिस्थिती आणि सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमास त्यांची व्यवस्था सुधारण्यासाठी सहाय्य म्हणून सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार हा निधी देण्यास महापालिकेची मंजुरी प्राप्त झाली आहे. यातील १०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मागील आठवड्यात बेस्ट उपक्रमाला देण्यात आला असला तरी या एक हजार कोटी रुपयांपैकी ५०० कोटी रुपये एवढी रक्कम न्यायालयातील निवाड्यानुसार बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्याकरता राखीव ठेवणे आवश्यक असतील. तसेच या एक हजार कोटी रुपयांच्या तरतुदीमधून, बेस्ट उपक्रमाच्या २००० इलेक्ट्रिक बसगाड्यांचे प्रवर्तन करण्याच्या प्रकल्पाचा खर्चातील मुंबई महानगरपालिकेचा ५ टक्के हिस्सा म्हणजेच १२८.६५ कोटी रुपयांच्या स्वतंत्र प्रस्ताव सादर केला जाईल आणि उर्वरीत ८७१.३५ कोटी रुपयांच्या अनुदानाचा निधी महापालिकेच्यावतीने उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने बेस्ट उपक्रमाला देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. (BMC)

(हेही वाचा – दाऊदी बोहरा मुसलमानांकडून Waqf Ammendment Law चे स्वागत; पंतप्रधान मोदींना भेटून मानले आभार)

त्यामुळे पाचशे कोटी रुपये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी आणि १२८ कोटी रुपये इलेक्ट्रिक बसेस खरेदीकरता वगळल्यास अन्य उर्वरीत रक्कम ही बेस्टला पायाभूत विकास आणि भांडवली उपकरणे खरेदी, कर्जाची रक्कम परतफेड, भाडेतत्वावरील नवीन बसेस घेण्यासाठी, आयटीएमएस प्रकल्प, बेस्ट उपक्रमामार्फत मे. टाटा पॉवर कंपनी लि. यांना देय असलेली विद्युत देणी तसेच वेतन करारान्वये येणारे आर्थिक दायित्व व दैनंदिन खर्च भागवणे आणि कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदान करणे आदींकरता वापरता येऊ शकतात. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी ५०० कोटी रुपये दिले जाणार असले तरी त्यातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपदानाचे अधिदान, बेस्ट उपक्रमाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची विविध देणी भागविण्यासाठी आदींकरताच वापरता येणार आहे. त्यामुळे एकप्रकारे बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरता दिलासा देणारी ही बाब आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.