बेस्ट प्रवाशांचे हाल! काय आहे कारण?

१ जानेवारीपासून बेस्ट मार्गात बदल झाले होते. बेस्ट प्रशासनाने काही मार्गात बदल केले, तर मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये बेस्ट मार्ग बंद करण्यात आले होते. यामुळेच सातरस्ता, धोबी घाट, करीरोड, डिलाइल रोड, आर्थर रोड या भागांत राहणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे. नव्या बदलांनुसार ना.म. जोशी मार्ग (डिलाइल रोड) आणि साने गुरूजी मार्ग (आर्थर रोड) येथे बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बदल झालेले बसमार्ग

  • बेस्ट उपक्रमाने डिलाइल रोड, आर्थर रोड मार्गावरील ६३, ७४, ७६ या बसमार्गात बदल केला आहे.
  • ३०, ६१, ७७ या क्रमांकाचे बसमार्ग बंद झाले आहेत.

अनेक बसमार्ग बंद झाल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागते, तर काही बससेवेसाठी बराच वेळ थांबून राहावे लागत आहे. बेस्ट प्रवाशांचे होणार हाल थांबावेत, यासाठी रविवारी ना.म. जोशी (डिलाइल रोड) मार्ग येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती.

( हेही वाचा : राज्यात १ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार महाविद्यालये… )

तक्रारी पाठवा 

बेस्ट उपक्रमाने बसमार्गांचे सुसूत्रीकरण करण्याचे ठरविले आहे. त्याविषयी काही तक्रारी असल्यास प्रवाशांनी तक्रारी, सूचना १८००२२७५५० या टोल फ्री क्रमांकावर किंवा [email protected] यावर पाठविण्याची विनंती केली बेस्ट प्रशासनाने केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here