गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईकरांच्या सेवेत डी.एन.नगर ते दहिसर पूर्व (मेट्रो-७) या मेट्रो सेवा सुरू झालेल्या आहेत. मेट्रो स्थानकांपर्यंत नागरिकांना ये-जा करणे सुलभ व्हावे याकरता महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने नवे बसमार्ग सुरू करण्याबाबत बेस्ट प्रशासनाला पत्र लिहिले आहे. नागरिकांकडून आलेल्या सूचनांच्या आधारावर मेट्रो संचलन मंडळाने बेस्ट प्रशासनाला प्रस्ताव पाठविला आहे. त्यामध्ये १८ मेट्रो स्थानकांच्या जोडणीसाठी व मेट्रो स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सुमारे ६० नवे बस मार्ग आणि बस थांब्याची मागणी करण्यात आली आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ फेरी पुन्हा सुरू करा! प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी)
बससेवा सुरू व्हावी या मागणीचे प्रस्ताव
मेट्रोकडून नागरिकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यानुसार १८ मेट्रो स्थानकांचे मिळून सुमारे ६० प्रस्ताव मेट्रो संचलन मंडळाने बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. त्यामध्ये आरे, पोईसर, अकुर्ली या स्थानकांवरून बससेवा सुरू व्हावी या मागणीचे प्रस्ताव अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
बेस्ट प्रशासनाने मेट्रो स्थानकांना सोयीस्कर अशा नव्या मार्गांचा समावेश केल्यास नागरिकांचा प्रवास आणखी सुकर होईल असे व्यवस्थापकीय संचालक डी.के. शर्मा यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community