बेस्ट उपक्रमाच्या दिंडोशी आगारात ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२३ या दरम्यान ‘रस्ता सुरक्षितता सप्ताहाचे’ आयोजन दिंडोशी आगारामध्ये करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो.
सर्व वाहक आणि चालकांनी बसगाडीवर काम करत असाताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. बेस्ट बसचा अपघात होणार नाही याची चालकांनी खबरदारी घ्यावी. या सप्ताहादरम्यान खालील विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
बेस्ट उपक्रमाचा रस्ता सुरक्षितता सप्ताह
- बसचालकांनी आपली बस नियोजित थांब्यावर उभी करावी.
- दोन बसमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
- प्रवाशांना चढण्या-उतरण्यास पुरेसा वेळ द्यावा.
- बसगाडी चालवत असताना सिग्नल लाल असताना गाड्या घेऊन जाऊ नये.
- बसगाडी महामार्गावरून घेऊन जाताना योग्य मार्गिकेमधून चालवावी.
- बस चालवताना मोबाईलचा वापर टाळावा.