नववर्षात मुंबईत ‘बेस्ट’चे स्मार्ट वीज मीटर, मोबाईलप्रमाणे करता येईल प्रिपेड रिचार्ज

140

बेस्ट उपक्रमाने वीज वितरण व्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी मुंबईत स्मार्ट वीज मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत येत्या ३ महिन्यांमध्ये ग्राहकांच्या घरी स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येणार आहेत. यामुळे ग्राहकांना वीज वापराची अचूक माहिती मिळू शकेल असा दावा बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

( हेही वाचा : सावधान! ३१ डिसेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्सवर बंद होणार व्हॉट्सअ‍ॅप! )

वीज ग्राहकांना मिळणार अचूक माहिती

सध्या या स्मार्ट मीटरची चाचणी सुरू आहे. दरम्यान या नव्या स्मार्ट मीटरसाठी बेस्टला १० लाखांहून अधिक ग्राहकांचे जुने मीटर बदलावे लागणार आहेत. या नव्या स्मार्ट मीटर्समुळे बेस्टच्या सर्व वीज ग्राहकांना वीज वापराबाबतची अचूक माहिती ऑनलाईन मिळणार आहे. यासाठी मोबाईल App सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल. एखाद्या महिन्यात विजेचा किती वापर झाला याची माहिती ग्राहकांना सहज उपलब्ध होईल.

प्रिपेड रिचार्ज सुविधा

या नव्या स्मार्ट मीटरमध्ये प्रिपेड सुविधा सुद्धा असणार आहे. महिन्याभरात किती वीज वापरणारप याचा अंदाज घेऊन ग्राहक मीटरचे आधीच रिचार्ज करू शकतात. रिचार्ज केलेल्या रक्कमे एवढीच वीज ग्राहकांना वापरता येणार आहे. पुढील ३ महिन्यांमध्ये बेस्टच्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे. यामुळे बिलाची अचूक माहिती मिळून ग्राहकांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.