बेस्ट उपक्रमाच्यावतीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून मुंबईतील विविध भागात वातानुकुलित बस सेव सुरु करण्यात आल्या आहेत. आजवर दक्षिण मुंबईतील ताज, ट्रायडंट आणि प्रेसिडेंट अशा विविध पंचतारांकित परिसरात वातानुकूलित बस सेवा सुरु करण्यात आल्या होत्या. परंतु आता १ नोव्हेंबर २०२१पासुन बोरीवली स्थानक पूर्व आणि विमानतळावरून वांद्रे-कुर्ला संकुलातून वाशी मार्गे वातानुकुलित बस सेवा सुरु करण्यात येत आहे. याचे कमीत कमी भाडे ५० रुपये तर जास्तीत जास्त भाडे १५० रुपये एवढे असणार आहे. बेस्ट उपक्रमाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
(हेही वाचा-जनाब राऊत तुम्हाला नबाव मलीकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय, चित्रा वाघ यांचा आरोप)
विमानतळ ३ वरून :
प्रवासमार्ग : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, वेअरहाऊस, व्ही.के.कृष्णमेमन मार्ग, बहार चित्रपटगृह, सल अलियावर जंग मार्ग उड्डाणपुलांवरून, बोरीवली पूर्व.
विमानतळावरून
सकाळी : सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत(तीन फेऱ्या)
संध्याकाळ : संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत (तीन फेऱ्या)
बोरीवली पूर्व येथून :
सकाळी: सहा ते आठ (तीन फेऱ्या),
संध्याकाळी: साडेतीन ते साडेपाच(तीन फेऱ्या)
वाशीपर्यंत
प्रवासमार्ग : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय मार्ग,वेअर हाऊस, व्हि.के.कृष्णमेमन मार्ग, बहार चित्रपट गृह, सर अलियावर जंग मार्ग, कलानगर, वांद्र-कुर्ला संकुल, बीकेसी कनेक्टर, प्रियदर्शनी, चेंबूर, मानखुर्द, वाशी बसस्थानक
विमानतळावरून
सकाळी : साडेसात ते साडेनऊ( ३फेऱ्या)
संध्याकाळ : पाच ते सात ( ३फेऱ्या)
वाशी बस स्थानकावरून
सकाळी : सहा ते आठ ( ३फेऱ्या)
संध्याकाळी : साडेतीन ते साडेपाच ( ३फेऱ्या)