बेस्टच्या महिला प्रवाशांना दिवाळीत असं आहे ‘ऑल द बेस्ट’

142

कोरोना लॉकडाऊन काळात रेल्वे प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते. याचकाळात बेस्टकडे प्रवाशांचा कल वाढीस लागला. बेस्टच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली. कार्यालयीन वेळांमध्ये सकाळी व सायंकाळी बेस्ट बसगाड्यांमधून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करू लागले आहेत. यात असंख्य महिला प्रवाशांचा समावेश आहे. यामुळेच बेस्टकडून ‘तेजस्विनी’ नावाने विशेष आरक्षित बस खास महिला प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली.

१००‘तेजस्विनी’ बसगाड्या

२०१९ पासून बेस्टच्या ताफ्यात तेजस्विनी बस दाखल झाल्या आहेत. आताच्या घडीला साधारण ३७ ‘तेजस्विनी’ धावत आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर महिला प्रवाशांची संख्या पुन्हा पूर्ववत झाली. यामुळेच तेजस्विनी बसगाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. येत्या काही महिन्यांत मुंबईत टप्प्याटप्यात १०० ‘तेजस्विनी’ बसगाड्या चालविण्यात येणार असल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली. त्यामुळे महिलांचा प्रवास सुखकर होण्यात मदत होईल. असे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले.

बेस्ट फे-यांमध्ये वाढ होणार

खास महिलांसाठी १०० गाड्या सेवेत आणण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरुन महिला प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल. असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले. तसेच मागणीनुसार बसगाड्यांच्या फे-यांमध्ये वाढ केली जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.