आता पर्यटनातही नाईट लाईफ! मध्यरात्रीपर्यंत ‘बेस्ट’ हेरिटेज टूर

177

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफ ही संकल्पना अस्तित्वात आणली. कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यावर आता मुंबई पर्यटनाच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आणि मुंबईकर जनतेला ‘दक्षिण मुंबईचे’ दर्शन घेता यावे याकरता ३ नोव्हेंबर २०२१ पासून खुल्या दुमजली बसगाडीतून पर्यटन सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून सुरुवातीला सायंकाळी ६.३० आणि रात्री ८.०० वाजता गेट वे ऑफ इंडिया येथून दोन बसफेऱ्या शनिवार आणि रविवार यादिवशी प्रवाशांना सेवा देत होत्या. त्यानंतर प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद लक्षात घेऊन नरिमन पॉईंट येथून दुपारी ३.०० आणि सायंकाळी ५.०० वाजता दोन अतिरिक्त बसफेऱ्या नरिमन पॉईंट येथून सुरु करण्यात आल्या. मुंबईतील उन्हाचा कडाका आणि या बसेसची लोकप्रियता लक्षात घेता बेस्ट उपक्रमाने या बेस्टच्या वेळेत बदल केला आहे. आता पर्यटकांना मध्यरात्रीपर्यंत दक्षिण मुंबईचे दर्शन घेता येणार आहे.

( हेही वाचा : होळीच्या सणाला पाण्याने भरलेले फुगे, पिशव्या मारताय? तर वाचा राज्य सरकारची नियमावली )

बेस्टचे आवाहन

फक्त शनिवार आणि रविवार या दिवशी सकाळी ०९.३० आणि ११.०० वाजता अतिरिक्त बसफेऱ्या बेस्ट उपक्रमामार्फत चालविण्यात येत होत्या. परंतु सध्या उन्हाळा सुरु झाला असल्यामुळे वातावरणातील बदल लक्षात घेऊन सदर पर्यटन सेवेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ही बससेवा १७ मार्चपासून आठवडयातील सर्व दिवस सायंकाळी ५.०० वाजल्यापासून मध्यरात्री उशिरापर्यंत कार्यरत राहील याची प्रवाशी जनतेने नोंद घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्या वतीने करण्यात येत आहे..

याठिकाणी तिकीटे उपलब्ध

पर्यटकांना तिकीट विक्रीसाठी तसेच अन्य माहितीकरिता डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक याठिकाणी संपर्क साधता येईल. त्याशिवाय बेस्ट उपक्रमाचा टोल फी क्रमांक १८००२२७५५० आणि ०२२२४१९०११७ या दूरध्वनी क्रमांकावर देखील या पर्यटनसेवेविषयी माहिती मिळू शकेल. तिकीट BookMyShow App तसेच डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक, गेटवे ऑफ इंडिया येथे आणि बसमध्ये देखील उपलब्ध आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.