बेस्टसह मेट्रोमधून एकाच तिकिटावर प्रवास; ‘मुंबई १’ कार्डाला प्रवाशांची पसंती!

‘मुंबई १’ या कार्डाद्वारे आता मुंबईकरांना मेट्रोसमवेत बेस्टचे तिकीट सुद्धा काढता येणार आहे. त्यामुळे मेट्रो आणि बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या एकात्मिक तिकीट प्रणालीद्वारे आता दोन्ही मार्गावर प्रवास करणे शक्य आहे.

( हेही वाचा : National Tourism Day : स्वस्तात फिरण्यासाठी IRCTC चे भन्नाट टूर पॅकेज! हिंदू धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी विशेष सहली )

‘मुंबई १’ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड

मेट्रो, मोनो, लोकल ट्रेन आणि बेस्ट यामध्ये एकच तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली विकसित करण्याची जबाबदाकी एमएमआरडीएला देण्यात आली होती. यानुसार आता एमएमआरडीएने ‘मुंबई १’ या नावाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड तयार केले आहे. या कार्डाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी करण्यात आले होते. त्यानंतर २० जानेवारीपासून मेट्रो २ अ ( दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो ७ ( दहिसर ते गुंदवली) या मार्गावरील स्थानकांवर हे कार्ड उपलब्ध करण्यात आले आहे. २० जानेवारीला तब्बल १ हजार ७८७ कार्डांची विक्री करण्यात आली होती.

सध्या या कार्डाचा वापर फक्त मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गांवरच करता येणार आहे. मेट्रो १ या मार्गाला बेस्ट, रेल्वेशी जोडण्यासाठीची चाचणी सुरू असून नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कार्डावरून मेट्रो, मोनो, रेल्वेसह बेस्टचे तिकिटही उपलब्ध होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here