बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात अलिकडेच डबल डेकर बस दाखल झाली आहे. तसेच सगळ्याच मार्गावर बेस्ट उपक्रमाकडून कमीत- कमी तिकीट दर आकारले जात असल्याने मुंबईकर प्रवासी बेस्टला पसंती दर्शवत आहेत.
( हेही वाचा : आता शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन नव्हे, ठाण्यातील ‘आनंदाश्रम’)
१५ मिनिटांच्या अंतराने फेऱ्यांचे नियोजन
दरम्यान, नरिमन पॉइंट ते सीएसएमटी रेल्वे स्थानक या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून वाढत्या मागणीनुसार आता या मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित बस सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. रात्री नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत नरिमन पॉइंट ते सीएसएमटी मार्गावर बेस्ट बस धावणार असून प्रत्येकी १५ मिनिटांच्या अंतराने फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
बेस्ट बस क्रमांक १११ आणि वातानुकूलित बस क्रमांक ११५
नरिमन पॉइंट परिसरातून सीएसएमटीला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशावेळी अनेकदा बसही मिळत नाही त्यामुळे बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. बेस्ट बस क्रमांक १११ आणि वातानुकूलिक बस क्रमांक ११५ या दोन्ही गाड्यांच्या फेऱ्या आता रात्री १०.३० पर्यंत सुरू राहणार आहेत. सध्या या बसेस फक्त ९ वाजेपर्यंत चालवण्यात येतात.
या दोन्ही बस गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी आणि रात्री १०.३० पर्यंत सेवा द्यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. ही मागणी बेस्ट उपक्रमाने मान्य केली आहे.