बेस्ट उपक्रमाने दैंनदिन कामकाज चालवण्यासाठी घेतलेल्या अल्प मुदतीचे ४५० कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी आता मुंबई महापालिकेच्यावतीने ४५० कोटी रुपयांची रक्कम आगावू स्वरुपात दिली आहे. त्यामुळे नोव्हेंबर व डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ या तिन महिन्यांमध्ये प्रत्येकी १५० कोटी रुपयांची रक्कम महापालिकेने बेस्ट उपक्रमाला उपलब्ध दिली आहे.
( हेही वाचा : मुंबई महापालिकेत ४२१ साह्यकारी परिचारिकांची भरती: सोमवारपासून अर्ज स्वीकारणार)
टाटा पॉवर कंपनी ची प्रलंबित विद्युत देण्याकरता ऑगस्ट २०२२पर्यंत १७७४ कोटी रक्कम व बेस्ट उपक्रमाच्या दैनंदिन कामकाजाचा खर्च पेलण्यासाठी ४५० कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज फेडण्यासाठी एकूण २२२४ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची मागणी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापकांनी २२ ऑगस्ट २०२२ रोजी पत्राद्वारे केली होती.
मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक वाहतुकीचे महत्व लक्षात घेऊन आणि उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन सन २०१९-२० पासून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील सप्टेंबर २०२२ पर्यंत करण्यात आलेल्या तरतुदींमधून २४०३ कोटी रुपये व तरतुदींव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम म्हणून नोव्हेंबर २०२२ पर्यंत ३६३० कोटी रुपये अशाप्रकारे एकूण ६०३३.८५ कोटी एवढ्या रकमेचे अधिदान करण्यात आले आहे.
यापूर्वी बेस्ट उपक्रमास या अगोदर निवृत्त कर्मचाऱ्यांची देणे भागविण्यासाठी देण्यात आलेल्या ४८२.२८ कोटी रुपये व ४५० कोटी रुपयांच्या रकमेबाबतचा सविस्तर अहवाल एक महिन्याच्या आत तसेच अल्प मुदतीचे कर्ज फेडण्यासाठी दिलेल्या ४५० कोटी रुपयांच्या रकमेबाबतचा सविस्तर अहवाल तीन महिन्यांमध्ये आत महापालिकेला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बेस्ट उपक्रमाने टाटा पॉवर कंपनी लिमिटेड यांना प्रलंबित विद्युत देण्यासाठी भागवण्यासाठी येणारा खर्च हा बेस्ट उपक्रमाला प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या अनुदानामधून भागवणे संयुक्तिक होईल. तसेच बेस्ट उपक्रमाकरता घेतलेल्या अल्प मुदतीचे कर्ज फेडण्यासाठी ४५० कोटी रुपयांची रक्कम तातडीने देणे आवश्यक असल्यामुळे बेस्ट उपक्रमाला ४५० कोटी रुपये एवढी रक्कम देण्याचा निर्णय महापालिका प्रशासकांनी घेतला. त्यानुसार नोव्हेंबर व डिसेंबर २०२२ या दोन मासिक हप्त्यांमध्ये प्रत्येकी १५० कोटी रुपये व जानेवारी २०२३ मध्ये १५० कोटी रुपये अशा स्वरुपात बेस्टला एकूण ४५० कोटी रुपयांची रक्कम दिली आहे.
Join Our WhatsApp Community