Indian Air Force Day : ९२व्या हवाई दल दिनानिमित्त सैनिक आणि कुटुबियांना शुभेच्छा !

भविष्यातील युद्धसज्जतेसाठी, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, अवकाश आणि सायबर क्षमता वाढवणे गरजेचे आहे

110
Indian Air Force Day : ९२व्या हवाई दल दिनानिमित्त सैनिक आणि कुटुबियांना शुभेच्छा !
Indian Air Force Day : ९२व्या हवाई दल दिनानिमित्त सैनिक आणि कुटुबियांना शुभेच्छा !

आज 92 वा भारतीय हवाई दल दिन. (Indian Air Force Day) त्यानिमित्त योद्धे, ज्येष्ठ, सेवानिवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हा ऐतिहासिक दिन, भारतीय हवाई दलाच्या जवळपास 100 वर्षांच्या कालखंडातील देशाप्रतीची अतुलनीय सेवा आणि समर्पण यांचे स्मरण करण्याचा, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा व्यक्त करण्यासाठी हवाई दल दिन साजरा केला जातो. या दिवशी देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानांनाही श्रद्धांजली वाहिली जाते. त्यांचे धैर्य, शौर्य आणि समर्पण कायमच भारतातल्या सर्व पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

देशाने लढलेल्या प्रत्येक युद्धात, भारतीय हवाई दलाने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आक्रमक हवाई हल्ले करणे, युद्धग्रस्त भूमीतून, परदेशस्थ भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणणे आणि सीमेपलीकडे जाऊनही कोणत्याही संकटात मानवी सहाय्य आणि आपत्तीच्या काळात मदत करण्यात हवाई दलाने महत्त्वाचे कार्य केले आहे तसेच भारताच्या मित्र राष्ट्रांसोबत होणाऱ्या संयुक्त युद्ध सरावात भारतीय हवाई दलाने, नियमित आणि यशस्वी सहभाग नोंदवला आहे. जागतिक हवाई दलांसोबत अत्यंत उत्तम सहकार्य करण्याचा प्रत्यय भारताने केला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाअंतर्गत, भारतीय हवाई दलाने स्वदेशी संरक्षण उत्पादनांच्या माध्यमातून आपला क्षमता विकास करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

भविष्यातील युद्धसज्जतेसाठी, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, अवकाश आणि सायबर क्षमता वाढवणे, अशा प्रयत्नातून हवाई दलाची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निर्णय साधने आणि प्रणाल्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे जसे की, स्वॉर्म अनमानेड युद्ध प्रणाली ही भारतीय हवाई दलाने आयोजित केलेल्या मेहर बाबा ड्रोन स्पर्धेद्वारेच या दलाला मिळाली आहे.

२१व्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यास भारतीय हवाई दल सज्ज असून त्यासाठी, आधुनिककरण, नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य घेण्यास भारत वचनबद्ध आहे. एकत्रित येऊन, भारतीय हवाई दलाचा सन्मान करूया. भारतीय हवाई दलाने भविष्यातही नवनवे सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवत राहावे, अशी माहिती लेफ्टनंट अनिल चौहान यांनी दिली

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.