बेस्ट उपक्रमाने 13 एप्रिलपासून प्रवाशांच्या सोयीसाठी ‘एकच सामायिक कार्ड’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड One Nation One Mobility Card) ही सेवा सुरू केली. रोख रकमेचा वापर टाळता यावा तसेच रेल्वे, मेट्रोने प्रवास करताना एकच सामायिक कार्ड असावे जेणेकरून प्रवाशांना तिन्ही मार्गांवर प्रवास करणे सोयीचे होईल हा यामागील मुख्य हेतू होता. या कार्डचा वापर उपहारगृहात, शॉपिंग करताना सुद्धा करता येतो. परंतु या कार्डला अल्प प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत केवळ ५८ कार्डची विक्री करण्यात आली अशी माहिती उपक्रमाने दिली आहे.
( हेही वाचा : कोकणात धावली अगीनगाडी…; जन्माची तिच्या अद्भुत कहाणी )
केवळ ५८ कार्डची विक्री
१३ एप्रिलला या कार्डची सुविधा सुरू झाली. त्यानंतर आतापर्यंत केवळ ५८ कार्डची विक्री करण्यात आली अशी माहिती उपक्रमाने दिली आहे तसेच यात ९७ वेळा रिचार्ज करण्यात आला असेही उपक्रमाने सांगितले आहे. या कार्डला मुंबईकरांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. या कार्डचा उपयोग करून डिजीटल व्यवहार व प्रवास करण्यास प्राधान्य मिळावे याकरता सचिन तेंडुलकर, अनिल कपूर यांच्या मदतीने बेस्टमार्फत ‘पुढे चला’ अभियान राबवण्यात येत आहे.
Bringing to you a convenient way to travel. Introducing the BEST NCMC Contactless Card in partnership with Chalo & Yes Bank that lets you ‘Tap & Pay’ conveniently for all your bus travels@YESBANK @chaloapp #RuPayBeOnTheGo pic.twitter.com/OTcxq7ThV0
— NPCI (@NPCI_NPCI) April 13, 2022
प्रवाशांना हे कार्ड मुंबईतील २७ बेस्ट आगारांमध्ये उपलब्ध करून दिले जाईल ही माहिती ट्वीट करत बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना दिली आहे. या कार्डचा फायदा वीजबिल, उपहारगृहांमधील बिले, शॉपिंग करण्यासाठी सुद्धा होणार आहे. या सामायिक कार्डचे रिचार्ज तुम्ही ऑनलाइन किंवा बेस्टच्या कंडक्टरमार्फत करू शकता.
Join Our WhatsApp Community