नवरात्रीनिमित्त बेस्टची मुंबईकरांसाठी खास ऑफर; 19 रुपयांत करू शकता 10 बसफेऱ्या; असा घ्या लाभ

92

नवरात्रीनिमित्ताने बेस्टने मुंबईकर प्रवाशांसाठी खास ऑफर आणली आहे. डिजिटल प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने नवरात्र उत्सवात विशेष ऑफर आणली आहे. केवळ 19 रुपयांच तिकीट काढल्यानंतर नवरात्रोत्सवात 10 बस फे-यांची सुविधा मिळणार आहे. बेस्ट प्रशासनाची ही खास ऑफर 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. चलो अॅपवर 19 रुपयांच्या तिकीटात नऊ दिवसांत कधीही 10 बसफे-यांचा प्रवास प्रवाशांना करता येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून ट्वीट करुन देण्यात आली आहे.

 

( हेही वाचा: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ‘या’ देवीची केली जाते पूजा, जाणून घ्या अख्यायिका )

असा घ्या ऑफरचा लाभ

  • या ऑफरचा लाभ घेण्यासाठी चलो अॅप डाऊनलोड करा
  • अॅपच्या बस पास विभागात ऑफर शोधा
  • यात दसरा ऑफर निवडा.
  • येथे तुमचा तपशील भरा आणि 19 रुपये ऑनलाइन पेमेंट करा
  • तुम्ही बसमध्ये चढल्यानंतर, Start a Trip हे बटण दाबा
  • प्रमाणीकरणासाठी तिकीट मशीनवर तुमचा फोन टॅप करा
  • यशस्वी प्रमाणीकरण झाल्यावर, तुम्हाला अॅपवरच ट्रीपची डिजिटल पावती मिळेल. हा संपूर्ण व्यवहार कॅशलेश आणि पेपरलेस आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.