गेल्या काही दिवसात औरंगजेबच्या कबरीवरून (Aurangzeb Tomb) राज्यात वाद निर्माण झाला आहे. त्यातच राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील (Khuldabad) कबर हटवण्याची मागणी जोर धरत असून त्यासाठी आंदोलने सुरु आहेत. अशातच या वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठं वक्तव्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
( हेही वाचा : Malabar Hill मधील ट्री टॉप वॉकमुळे दोन दिवसांत ८६ हजार रुपयांची कमाई)
याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) म्हणाले की, मुघल शासक औरंगजेबाच्या कबरीचा (Aurangzeb Tomb) विषय अनावश्यकपणे चर्चिला जात आहे. औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रात झाला, म्हणून त्याची कबर इथेच असणार. काही लोकांची श्रद्धा असेल तर ते तिथे जातील. मात्र छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे सर्वांचे आदर्श आहेत. त्यांनी तर अफजलखानाचीही (Afzal Khan) कबर किल्ल्यावर बनवली आहे. हे भारताच्या उदारतेचे, सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे, असे विधान भय्याजी जोशी यांनी केले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनीही हा विषय चर्चिला जाण्याची गरज नाही, असे वक्तव्य केले होते. आता ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनीही याप्रकरणी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, इतिहासाकडे जात आणि धर्माच्या चष्म्यातून पाहिले जाऊ नये. विजापूर (Vijayapura) सल्तनतचा सेनापती अफजल खान याला प्रतापगड किल्ल्याजवळ दफन करण्यात आले होते. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या परवानगीशिवाय करता आले नसते. त्यामुळे आता औरंगजेबाची कबर आहे तशीच राहील, ज्याला जायचे आहे तो जाईल.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community