आता छटपूजेसाठीही कृत्रिम तलाव उभारण्याची मागणी

गणपती विसर्जन आणि नवरात्रौत्सवात दुर्गामाता विसर्जन यासाठी कृत्रिम तलाव, हौद महापालिकेच्या विविध उद्यानांमध्ये उभारण्यात आलेले होते. त्याच धर्तीवर छटपूजेसाठी छोटासा कृत्रिम तलाव/हौद महापालिकेच्या अखत्यारितील जागेवर उभारावीत. तिथे एकावेळी २०० पेक्षा कमी लोकांना कोविड खबरदारीचे सर्व नियम पाळून, मास्क लावून, सामाजिक अंतरचे ध्यान ठेवून छटपूजा करण्याची परवानगी देण्यासाठी आवश्यक ती मार्गदर्शक तत्वे तयार करावीत. यासंबंधीचे आदेश विभागीय सहाय्यक आयुक्तांना द्यावेत, अशी मागणी भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी पत्राद्वारे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे केली.

काय म्हटले पत्रात? 

  • मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतातील लोक वास्तव्य करतात. उत्तर भारतात दिवाळीनंतर लगेचच छटपूजा या धार्मिक विधीचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. ही छटपूजा ही सूर्य देवतेची पूजा असल्याने ती उघड्या मैदानातच करावी लागते व ती घरी करता येत नाही.
  • गेले कित्येक वर्षे मुंबई शहरात सुद्धा छटपूजेचे आयोजन विविध ठिकाणी केले जात आहे. दरवर्षी या कार्यक्रमास मुंबई महानगरपालिका आवश्यक परवानगी देत असते. परंतू, कोविडच्या पार्श्वभूमीवर छटपूजेसाठी परवानगी देताना विशेष खबरदारी घेणे आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्वे ठरविणे आवश्यक आहे.
  • गेल्या वर्षी १७.११.२०२० रोजी छटपूजेसाठी नियमावली बनवून मर्यादित स्वरुपात परवानगी दिलेली होती. त्याच धर्तीवर या वर्षीही परवानगीसाठी परिपत्रक निर्गमित करणे आवश्यक आहे.
  • या पत्राद्वारे भारतीय जनता पक्षामार्फत मी आपणांस विनंती करतो की, दिवाळीनंतर लगेचच १० व ११ नोव्हेंबर २०२१ ला येणा-या छटपूजा कार्यक्रमासाठी आपण सुधारित मार्गदर्शक तत्वे निश्चित करुन नियम व अटींच्या अधिन राहून परवानगी द्यावी. साधारणत: आजमितिस २०० लोकांपर्यंत कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे.

(हेही वाचा : ड्रग्स विकणाऱ्या नायझेरियन लोकांना नवाब मलिकांचा आशीर्वाद!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here