Bhandara Blast : स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट ; १३ मृत, आकडा वाढण्याची शक्यता

73
Bhandara Blast : स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट ; १३ मृत, आकडा वाढण्याची शक्यता
Bhandara Blast : स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट ; १३ मृत, आकडा वाढण्याची शक्यता

जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत (Ordnance Manufacturing Company) स्फोट झाला आहे. त्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी (24 जाने.) सकाळी११ वाजता ही घटना घडली. भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरला. दूरपर्यंत स्फोटाचे हादरे बसले. (Bhandara Blast)

हेही वाचा-Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदेसह ११ जणांविरोधात FIR दाखल ; प्रकरण काय ?

कारखान्याच्या आर, के ब्रँचमध्ये हा स्फोट झाला. कंपनीचे छत कोसळल्यामुळे जवळपास 13 जण ठार झाल्याचा दावा केला जात आहे. या छताचा ढिगारा जेसीबीच्या मदतीने हटवण्यात येत आहे. त्यात संपूर्ण इमारत उद्धवस्त झाली. या घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती असल्यामुळे मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Bhandara Blast)

हेही वाचा-Ramdas Kadam उद्धव ठाकरेंवर कडाडले; म्हणाले, “जनतेनेच गद्दार कोण हे…”

आतापर्यंत 2 जणांना वाचवण्यात यश मिळालं आहे. कारखाना परिसरात रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबवण्यात येत आहे, अशी माहिती भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी दिली आहे. संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने या स्फोटात कारखान्याचा छत कोसळल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. घटनास्थळी 12 जण अडकले असण्याची शक्यता असून, त्यातील 2 जणांना वाचवण्यात आले आहे, असे ते म्हणाले. (Bhandara Blast)

हेही वाचा-Bus Ticket : एसटी, रिक्षा- टॅक्सीचा प्रवास महागणार ; १५ टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी

जवाहरनगर स्थित ऑर्डिनन्स फॅक्ट्रीच्या आरकेआरच्या ब्रँच सेक्शनमध्ये हा स्फोट झाला. येथे RDX तयार करण्याचे काम केले जाते. सध्या कंपनीचे मुख्यद्वार सील करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी गेट जवळ एकच गर्दी केली आहे. स्फोट झालेल्या कारखान्यात चाचणी सुविधा व आधुनिक प्रयोगशाळा आहे. याठिकाणी भारतीय लष्करासाठी अनेक प्रकारची उत्पादने तयार केली जातात. यात अॅसिडपासून अनेक प्रकारच्या स्फोटकांचा समावेश आहे. या स्फोटात ही चाचणी सुविधा व प्रयोगशाळेचे काही नुकसान झाले का? हे तपासले जात आहे. (Bhandara Blast)

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ‘भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असून त्या लवकरच पोहोचतील. संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा चमू सज्ज ठेवल्या आहेत. आतापर्यंत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’ असं ते म्हणाले आहेत. (Bhandara Blast)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.