दहावी आणि बारावीची परीक्षा पारदर्शक व्हावी, म्हणून बोर्डाने यंदा प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेसाठी भरारी पथके नेमण्याचा (Copy Free Exam Bbharari Squads) निर्णय घेतला आहे. बारावीतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारीपासून, तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून सुरू होईल.
जिल्ह्यातील अनेक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून १०० टक्के निकालासाठी भरारी पथकांचा अंदाज घेऊन वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगितली जातात, ही वस्तुस्थिती आहे. अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची खात्री असलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेतात, अशी स्थिती आहे. यासंदर्भातील तक्रारी बोर्डाकडे आल्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच बोर्डाने भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षणतज्ज्ञांचा सल्ला…
या परीक्षेबाबत शिक्षणतज्ज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवलेले मत असे की, विद्यार्थ्यांनी प्रश्नांचा सराव करावा. दहावी-बारावीतील गुण म्हणजे आयुष्य नव्हे तसेच पालकांनाही त्यांनी सूचना केली आहे की, दहावी-बारावीतील गुण म्हणजे आयुष्य नव्हे. पालकांनी त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नये. परीक्षेची चिंता न करता अभ्यास करावा. पुरेशी झोप घ्यावी.
परीक्षा कधी?
बारावीतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारीपासून, तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून सुरू होईल.
हेही पहा –