Bharat Gaurav Tourist Train : २०२३ मध्ये ‘भारत गौरव’ रेल्वेगाड्यांनी 96 हजार पर्यटकांनी केले पर्यटन

Bharat Gaurav Tourist Train : 'भारत गौरव' रेल्वेगाड्या श्री राम-जानकी यात्रा - अयोध्या ते जनकपूर; श्री जगन्नाथ यात्रा; 'गरवी गुजरात' सहल; आंबेडकर सर्किट; ईशान्य सहल यासारख्या प्रमुख पर्यटन पट्ट्यांमध्ये करतात प्रवास

156
Bharat Gaurav Tourist Train : २०२३ मध्ये 'भारत गौरव' रेल्वेगाड्यांनी 96 हजार पर्यटकांनी केले पर्यटन
Bharat Gaurav Tourist Train : २०२३ मध्ये 'भारत गौरव' रेल्वेगाड्यांनी 96 हजार पर्यटकांनी केले पर्यटन

भारतीय रेल्वेने ‘भारत गौरव’ पर्यटक गाड्यांअंतर्गत संकल्पना-आधारित मार्गांवर पर्यटक गाड्या चालवण्याची संकल्पना मांडली. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे प्रदर्शित करणे हा या संकल्पना आधारित पर्यटक मार्ग गाड्यांचा उद्देश आहे. (Bharat Gaurav Tourist Train)

(हेही वाचा – Maharashtra : राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र टॉप परफॉर्मर!)

172 फेऱ्या चालवल्या

2023 मध्ये, 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या देशभरातील विविध पर्यटन स्थळांवरून 96,491 पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या भारत गौरव गाड्यांच्या एकूण 172 फेऱ्या चालवण्यात आल्या आहेत. या गाड्यांनी श्री राम-जानकी यात्राः अयोध्या ते जनकपूर (Shri Ram-Janaki Yatra);  श्री जगन्नाथ यात्रा (Shri Jagannath Yatra); “गरवी गुजरात” सहल (Garavi Gujarat); आंबेडकर सहल; ईशान्य सहल (Northeast Trip) यासारख्या प्रमुख पर्यटन क्षेत्रांचा प्रवास केला आहे.

या गाड्यांमधील प्रवास खर्च सर्वसमावेशक सहल पॅकेजेसच्या स्वरूपात दिला जातो. यात आरामदायी रेल्वे प्रवास आणि संबंधित सेवांसह ऑफ-बोर्ड प्रवास आणि बसमधून स्थलदर्शन , हॉटेलमध्ये राहणे, सहल मार्गदर्शक, जेवण, प्रवास विमा इत्यादी सेवा पुरवल्या जातात.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : उबाठा सेनेने हिंदूंचा अपमान करणे बंद करावे; देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर)

देशांतर्गत पर्यटनाला चालना

भारत गौरव रेल्वेगाडी योजनेंतर्गत उत्तम दर्जाच्या डब्यांसह रेल्वे आधारित पर्यटनाच्या तरतुदीद्वारे देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक संयुक्त उपक्रम हाती घेतला आहे. देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केन्द्र सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि ‘देखो अपना देश’ या उपक्रमांच्या अनुषंगानेही हे पाऊल उचलले आहे. (Bharat Gaurav Tourist Train)

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.