भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०१९च्या धर्तीवर : महापालिका आयुक्तांच्या सूचना

251

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल २०२३ रोजी आहे. या जयंती दिनी दादर परिसरातील चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असतात. या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर विविध स्तरिय कार्यवाही आणि अनुषंगिक कामांनी आता वेग घेतला आहे. याबाबत दीड महिना आधीच एक विशेष आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी घेत महानगरपालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांना यंदाच्या जयंती दिनानिमित्तची व्यवस्था ही कोविड पूर्व परिस्थितीनुरुप अर्थात सन २०१९ च्या धर्तीवर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी महापालिकेच्या स्तरावर राबवण्यात येणाऱ्या सुविधा आणि कामांसंदर्भात महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका मुख्यालयात एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बेस्ट चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांच्यासह सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, गजानन बेल्लाळे, मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर या बैठकीला संबंधित समन्‍वय समितीचे व संबंधित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने डॉ. भंते राहूल बोधी – महाथेरो, सरचिटणीस नागसेन कांबळे, उपाध्‍यक्ष महेंद्र साळवे, उपाध्‍यक्ष रवी गरुड आणि मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीच्या सुरुवातीला उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनी अर्थात १४ एप्रिल २०२३ रोजी करण्यात येणा-या व्यवस्थेबद्दल माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने चैत्यभूमीसह संबंधित ठिकाणी देण्यात येणा-या नागरी सेवा-सुविधा, आपत्कालीन व्यवस्थापन विषयक उपाययोजना याबाबत माहिती दिली. तसेच सदर दिवशी करण्यात येणा-या वैद्यकीय मदत व्यवस्थेबाबत देखील बिरादार यांनी माहिती दिली. संगणकीय सादरीकरणानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या नियोजित व्यवस्थेबाबत महानगरपालिका आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.