भारतवर्ष जोडो यात्रेला मुंबईतील बाणगंगा येथून होणार सुरुवात

72

अभिनव भारत (सार्वजनिक धर्मादाय न्यास) २००१ पासून वीर सावरकरांच्या आदर्शानुसार कार्य करत आहे. ३० मार्च २०२३, म्हणजेच रामनवमीच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता या संस्थेने आयोजित केलेल्या भारतवर्ष जोडो यात्रेला मुंबईतील बाणगंगा येथून सुरुवात होणार आहे.

माता सीतेला शोधत श्रीप्रभु राम मुंबईला आले. समुद्रतटी त्यांनी वाळू मधे शिवलिंगाची स्थापना करून शिवाची प्रार्थना केली. ही जागा आजच्या घडीला वाळकेश्वर म्हणून ओळखली जाते. थकलेल्या प्रभु रामांनी लक्ष्मणाला सांगितले की, त्यांना तहान लागली आहे. परंतु जवळपास समद्रच्या खारट पाण्याशिवाय काहीच नव्हते. त्यावेळी लक्ष्मणाने भूमिमध्ये एक बाण मारला आणि गोड पाण्याची गंगा अवतरली. या पवित्र स्थळला ‘बाणगंगा’ म्हणतात.

भारतवर्ष जोडो यात्रेचा प्रारंभ करण्यासाठी रामनवमीचा शुभ दिवस आणि बाणगंगेचे पवित्रस्थळ सर्वोतम आहे.

या यात्रेचे तीन चरण आहेत

१. भारतवर्ष आणि भारतीय संस्कृती

भारतवर्षाची व्याप्ति कैलाश मानसरोवर पासून सुरू होऊन पूर्वेत ब्रम्हपुत्रा आणि पश्चिमेमध्ये सिंधु नदीचे जलाशय तर दक्षिणेत भारतीय महासागरापर्यंत आहे.

वीर सावरकरांनुसार “या भूभागात उत्पन्न संस्कृतिच्या हृदयात माता सीता आणि प्रभू राम विराजतात. इंद्रधनुष्याच्या विविध रंगांनी त्याची सुंदरता निखारते तसेच विभिन्न धर्म पारसी पहूदी मुस्लिम, ईसाई – मुळे भारतीय समाज अधिक सुंदर होतो”

या पवित्र विचारांना पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न भारतवर्ष जोडो यात्रेद्वारा केला जात आहे. अर्थात हा अखंड भारतवर्षामधे भावनिक एकता आणण्याचा आध्यात्मिक प्रयास आहे. याची सुरुवात रामनवमीच्या दिवशी भारतवर्षाच्या ११ नद्यांचे पाणी बाणगंगेत अर्पण करून केले जाईल. २०२३ च्या श्री गणेश उत्सव पर्यंत अजून १०० नद्यांचे पाणी बाणगंगेत अर्पण केले जाईल.

तत्पश्चात हे पवित्र पाणी तीर्थ स्वरूपात वितरित करण्यात येईल. त्यामुळे ह्या गोष्टीचे सदैव स्मरण राहील की, भारतवर्ष भावनिक स्तरावर अखंड आहे. ह्या पवित्र भूमीला मात्र राजनीतिक स्वार्थासाठी खंडित केले होते.

२. लोकमान्य टिळक प्रेरित सार्वजनिक गणेश उत्सव

२०२३ पासून विविध जागी लोकमान्य टिळक प्रेरित सार्वजनिक गणेश उत्सव आयोजित केला जाणार आहे. १० दिवसीय श्री गणेश पूजेबरोबर हॉकी फुटबॉल स्पर्धा तसेच वाद विवाद स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातील.

३. मॅडम कामा आंतरराष्ट्रीय विश्वविद्यापीठ

मॅडम कामा वीर सावरकरांसाठी प्रेरणा स्त्रोत होत्या. २० ऑगस्ट १९०७ ला त्यांनी स्वतंत्र भारतवर्षाचा झेंडा स्टुटगार्ट जर्मनीला फडकावला होता. भारतवर्षाच्या भावनिक एकतेला मूर्त स्वरूप देण्यासाठी अभिनव भारत २०२४ पर्यंत मॅडम कामा आंतरराष्ट्रीय विश्वविद्यापीठाची स्थापना करणार आहे.

भारतवर्ष जोडो यात्रेला गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर न्यासचे (GSB Temple Trust) समर्थन आहे. भारतवर्ष जोडो यात्रेचे प्रमुख जस्टिस वि. स. कोकजे असून ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि विश्व हिन्दू परिषदचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.