नव्या भारतीय न्यायिक संहितेनुसार कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने स्वतःची धार्मिक ओळख लपवून लग्न केल्यास किंवा दिशाभूल केल्यास त्याला १० वर्षांची शिक्षा होणार आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ६९ मध्ये त्याविषयी वर्णन केले आहे. (Bharatiya Nyaya Sanhita)
(हेही वाचा – Konkan Railway: मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी; कोकण रेल्वे ठप्प)
या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे अॅडव्होकेट रुद्र विक्रम सिंह यांनी सांगितले की, लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून किंवा ओळख लपवून लग्न करणे हा गुन्हा घोषित करण्यात आला आहे. ‘लव्ह जिहाद’च्या कटांना सामोरे जाण्यासाठी शिक्षा निश्चित करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्याला आता मृत्यूदंडाची शिक्षा
भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ६३ मध्ये बलात्काराची व्याख्या निश्चित करण्यात आली आहे, तर कलम ६४ मध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. बलात्काराच्या प्रकरणांमध्ये दोषीला किमान १० वर्षांची शिक्षा आहे. कलम ७० (२) मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्याला शिक्षा निश्चित करण्यात आली आहे. १६ वर्षांखालील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्यांची शिक्षा २० वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच यामध्ये फाशीच्या शिक्षेचीही तरतूद आहे. १२ वर्षांपेक्षा अल्प वयाच्या मुलीवर बलात्कार केल्यास किमान २० वर्षांचा कारावास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. (Bharatiya Nyaya Sanhita)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community