लीला सॅमसन (Leela Samson) ह्या भरतनाट्यम नृत्यांगना (Bharatanatyam dancer), नृत्यदिग्दर्शक (Choreographer), प्रशिक्षक, लेखिका आणि अभिनेत्री आहेत. त्या दिल्लीतील श्रीराम भारतीय कला केंद्रात (Shri Ram Indian Art Center Delhi) अनेक वर्षांपासून भरतनाट्यम शिकवत आहेत. ऑगस्ट २०१० मध्ये संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षपदी त्यांनी नियुक्ती करण्यात आली आणि एप्रिल २०११ मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) चे अध्यक्ष म्हणूनही नियुक्ती करण्यात आली. (Leela Samson )
सॅमसन यांचा जन्म ६ मे १९५१ रोजी तामिळनाडूच्या कुन्नूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव व्हाईस ॲडमिरल बेंजामिन अब्राहम सॅमसन आणि आईचे नाव लैला सॅमसन… त्यांचे वडील पुण्यातील ज्यू बेने-इस्रायली समुदायाचे होते आणि आई अहमदाबाद येथील गुजराती रोमन कॅथलिक समुदायातील होती.
(हेही वाचा – Congress : अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतल्याने पक्षातून विरोध; काँग्रेसच्या महिला नेत्याचा पक्षाला रामराम )
त्यांनी २०१५ मध्ये मणिरत्नम दिग्दर्शित ओके कानमानी या तमिळ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ओके जानू, आदित्य वर्मा आणि पुथम पुधू कालाई मध्ये देखील त्यांनी काम केले आहे. नृत्यांगना म्हणून त्यांनी भारतासह युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेतही आपल्या नृत्याची झलक दाखवली आहे. त्यांनी १९९५ मध्ये स्पंदा या नृत्य समुहाची स्थापना केली. सॅमसन यांना पद्मश्री, तमिळनाडू सरकारचा संस्कृती, नृत्य चूडामणी, कलईमामणी आणि भरतनाट्यममधील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. (Leela Samson)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community