पुण्यातील (Pune)वाहतुकीसाठी सगळ्यात महत्त्वाचा असलेल्या भिडे पुलासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भिडे पुलाजवळील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या भागात पुणे महानगरपालिका पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरु करणार आहे. त्यामुळे हा पूल आता दोन महिने पुणेकरांना वापरता येणार नाही आहे. मात्र यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहे. त्यामुळे दोन महिने पुणेकरांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे. (Bhide Bridge)
डेक्कन जिमखाना येथील पीएमपी स्थानक ते भिडे पूल दरम्यान पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सोमवारपासून (१६ ऑक्टोबर) सुरू करण्यात येणार आहे. हे काम साधारणपणे १५ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. गरज भासल्यास केळकर रस्तामार्गे भिडे पुलावरुन डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी महापालिकेतर्फे विविध कामं सुरु आहे. अनेक परिसरात खड्डे बुजवण्याचंदेखील काम सुरु आहे शिवाय पुण्यात मेट्रोचंदेखील काम सुरु आहे. या कामांमुळे वाहतूक कोंडी होते आणि याच वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागतो. त्यात आता भिडे पूल बंद करण्यात येणार असल्याने पुणेकरांना वळसा घालावा लागणार आहे.
(हेही वाचा : Israel -Palestine Conflict : इस्रायलबरोबरच्या युद्धात हमासला साथ देणार; हिजबुल्लाहने वाढवली चिंता)
पर्यायी मार्ग कोणते?
- केळकर रस्तामार्गे डेक्कन जिमखान्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
- केळकर रस्त्यावरुन जंगली महाराज रस्त्याकडे जाणारे, तसेच जंगली महाराज रस्त्यावरुन केळकर रस्तामार्गे नारायण पेठेकडे येणाऱ्या वाहनचालकांनी शक्यतो गाडगीळ पुलाचा (झेड ब्रीज ) वापर करावा.
- भिडे पूल, सुकांता हाॅटेल, खाऊ गल्लीमार्गे जंगली महाराज रस्त्याने वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.
हेही पहा –