गेल्या काही दिवसांपासून वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) ही चर्चेचा विषय बनली आहे. कधी कोणी या ट्रेनवर दगडफेक केली म्हणून तर कधी यामधील प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाले म्हणून. अशातच आता पुन्हा एकदा वंदे भारत चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला (Vande Bharat Express) आग लागली. आज (सोमवार १७ जुलै) सकाळी कुरवई स्थानकाजवळील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या सी १४ या बोगीमधील बॅटरीला आग लागली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
राणी कमलापतीहून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या (Vande Bharat Express) सी-१४ बोगील आग लागली. गाडी क्रमांक २०१७१ भोपाळ-हजरत निजामुद्दीन वंदे भारत पहाटे ५.४० वाजता निघाली. बीना स्टेशनच्या अलीकडेच ही घटना घडली. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, बॅटरीला ही आग लागली. आगीची माहिती मिळताच ट्रेन थांबवण्यात आली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
(हेही वाचा – Legislature Monsoon Session 2023 : अर्ध्या तासात विधानसभा दिवसभरासाठी तहकूब)
ट्रेनमधून (Vande Bharat Express) प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सी-१४ कोचमधील बॅटरीजवळ धूर निघत होता. यानंतर बॅटरी बॉक्समधून ज्वाळा निघू लागल्या. बिना रेल्वे स्थानकापूर्वी कुरवाई केथोरा येथे गाडी थांबवण्यात आली आणि प्रवासी सुखरूप उतरले.
Madhya Pradesh | A fire was reported in battery box of one of the coaches in a Vande Bharat Express at Kurwai Kethora station. The fire brigade reached the site and extinguished the fire: Indian Railways
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) July 17, 2023
आगीची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोटमध्ये एकूण ३६ प्रवासी होते जे सकाळी सात वाजता कुरवाई केथोरा येथे ट्रेनमधून उतरले. कुरवाई केथोरा स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग लागल्याचे भारतीय रेल्वेनेही सांगितले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग विझवली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community