Bhopal Gas Tragedy : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात असताना अमेरिकेत उपस्थित झाला भोपाळ गॅस दुर्घटनेचा मुद्दा

207
Bhopal Gas Tragedy : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात असताना अमेरिकेत उपस्थित झाला भोपाळ गॅस दुर्घटनेचा मुद्दा
Bhopal Gas Tragedy : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात असताना अमेरिकेत उपस्थित झाला भोपाळ गॅस दुर्घटनेचा मुद्दा

भोपाळ गॅस दुर्घटनेचा उल्लेख करत अमेरिकेतल्या १२ खासदारांनी डाऊ केमिकल्सच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. (Bhopal Gas Tragedy) अमेरिकेच्या न्याय विभागाला या १२ खासदारांनी पत्र लिहिलं आहे. डाऊ केमिकल्स या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई केली गेली पाहिजे असे आता या बारा सदस्यांनी म्हटले आहे. डाऊ केमिकल्सची शेजारी असलेल्या युनियन कार्बाईड कंपनीत १०० टक्के भागिदारी होती. डिसेंबर १९८४ मध्ये युनियन कार्बाईड या कंपनीतून विषारी गॅसची गळती झाली होती. (Bhopal Gas Tragedy)

(हेही वाचा – Commissioner : आयुक्तांना, नकोय अधिकाऱ्यांकडून  कोंबडा!)

काय आहे भोपाळ गॅस दुर्घटना प्रकरण
  • २ आणि ३ डिसेंबर १९८४ या दोन दिवशी युनियन कार्बाईड या कंपनीतून विषारी गॅसची गळती झाली होती. या दुर्घटनेत ५ हजार २९५ लोकांचा मृत्यू झाला, ही त्यावेळी अधिकृत दिलेली संख्या होती. मात्र १९९७ मध्ये सरकारने सांगितलं की या घटनेत २५ हजार लोकांचा मृत्यू झाला. (Bhopal Gas Tragedy)
  • गॅस गळतीचा थेट परिणाम ५ लाख ५८ हजार १२५ लोकांवर झाला होता. ७ डिसेंबर १९८४ या दिवशी कंपनीचा सीईओ अँडरसनला अटक करण्यात आली. मात्र अवघ्या सहा तासांत वॉरेन अँडरसनला सोडून देण्यात आले.
  • युनियन कार्बाईडने ४७० मिलियन डॉलर्सची भरपाई या बदल्यात दिली होती. १९९२ मध्ये भोपाळ कोर्टाने या प्रकरणातला मुख्य आरोपी अँडरसनला फरार घोषित केले. त्यानंतर २०१४ मध्ये अँडरसनचा मृत्यू झाला.
  • भोपाळच्या कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी डाऊ केमिकल्सने न्यायालयात हजर राहिले पाहिजे, यासाठी ७ वेळा डाऊ केमिकल्सला समन्स पाठवण्यात आले आहे. सातव्या समन्समध्ये ४ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

अमेरिकेच्या द वीक या वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या वृत्तानुसार डाऊ केमिकल्सला समन्स पाठवूनही अमेरिकेच्या सरकारने त्यांच्या विरोधात कारवाई केलेली नाही. आता या प्रकरणी १२ सदस्यांनी आवाज उठवला आहे. तसेच या प्रकरणी कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे. (Bhopal Gas Tragedy)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.