PM Narendra Modi यांच्या हस्ते ३० ऑगस्टला वाढवण बंदराचं भूमिपूजन

135
PM Narendra Modi यांच्या हस्ते ३० ऑगस्टला वाढवण बंदराचं भूमिपूजन

वाढवण बंदर प्रकल्प महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरू शकतो, असे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन ३० ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीमध्ये मोठी वाढ होईल, असा दावा सरकारकडून केला जात आहे.

प्रकल्पाची कुल गुंतवणूक ७६,२०० कोटी रुपये असून, यासाठी केंद्र व राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात समुद्रात उभारण्यात येणाऱ्या या बंदराच्या कामाला २९२५ च्या पावसाळ्यानंतर सुरूवात होईल. यासाठी १४४८ हेक्टर समुद्रात भराव टाकला जाईल. या बंदराच्या उभारणीसाठी ७७ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, २०२९ पर्यंत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – महाराष्ट्रातील निवडणुकांविषयी Supriya Sule यांचे सरकारवर आरोप; म्हणतात…)

तथापि, स्थानिकांसाठी हा प्रकल्प विवादास्पद ठरला आहे. गेल्या २५ वर्षांपासून डहाणू तालुक्यातील स्थानिकांनी या बंदराला विरोध दर्शविला आहे. विविध स्थानिक संघटनांनी पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचे आणि आंदोलन आयोजित करण्याचे संकेत दिले आहेत. (PM Narendra Modi)

वाढवण हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर असून, येथे २० मीटरपेक्षा अधिक खोली आहे, त्यामुळे मोठ्या कंटेनर जहाजे सहज येऊ शकतात. बंदराच्या दोन्ही टप्प्यातील काम २९८ दशलक्ष टन क्षमतेच्या बंदराचे बनवले जाईल, ज्यामुळे भारतातील व्यापार आणि सागरी अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. या प्रकल्पामुळे स्थानिक आर्थिक व सामाजिक स्थितीवर मोठा परिणाम होईल, असं मानलं जातंय. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.