बलात्काराचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी भूषण कुमारला खंडणीसाठी आले फोन

शुक्रवारी रात्री भूषण कुमार यांचे काका कृष्ण कुमार यांनी आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पुतण्यावर दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यानंतर त्याला धमकीचे फोन येत असून, त्याच्याकडे पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार टी-सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांचे काका आणि गुलशन कुमार यांचे बंधू कृष्ण कुमार यांनी आंबोली पोलिस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी मल्लिकार्जुन पुजारी या व्यक्ती विरोधात खंडणी आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कृष्ण कुमार यांची तक्रार

टी-सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार यांच्यावर, अंधेरी येथील डी. एन. नगर पोलिस ठाण्यात नुकतीच एका ३० वर्षीय मॉडेलने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी भूषण कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान शुक्रवारी रात्री भूषण कुमार यांचे काका कृष्ण कुमार यांनी आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

(हेही वाचाः टी-सिरीजचे संचालक भूषण कुमारवर बलात्काराचा गुन्हा दाखल!)

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

या तक्रारीत त्यांनी भूषण कुमार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापूर्वी एक व्यक्ती त्याला सतत फोन करुन धमकी देत होती. मॉडेलवर बलात्कार केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवून प्रसार माध्यमांकडे जाऊन, बदनामी करण्याची धमकी मल्लिकार्जुन नावाच्या व्यक्तीकडून येत होती. तसेच हे सर्व थांबवण्यासाठी भूषण कुमार यांच्याकडे पैशांची (खंडणी) मागणी करण्यात आली होती, असे कृष्ण कुमार यांनी आंबोली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आंबोली पोलिसांनी खंडणी, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मलिकार्जुन पुजारी नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here