Pune Rape Case : पुण्यात भूतानच्या तरुणीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक

116

भूतान (Bhutan) देशाची नागरिक असलेल्या 27 वर्षीय तरुणीवर पुण्यात सात जणांकडून लैंगिक अत्याचार (Sexual Assault) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही भूतानी महिला वर्ष २०२० पासून पुण्यात वास्तव्याला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Pune Rape Case) यावरून शंतनू कुकडे याच्यासह ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, ॲड विपीन बिडकर, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासीन मेनन यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. शंतनू कुकडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी आहे.

(हेही वाचा – विधानसभेने मंजूर केलेली विधेयके राज्यपालांनी रोखण्यावर Supreme Court ने घातले निर्बंध)

भूतान या देशाची ही महिला २०२० साली भारतातील बोध गया येथे भेट देण्यासाठी आली होती. त्यानंतर शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश नावाच्या युवकासोबत झाली. ऋषिकेशने त्या पीडित महिलेची ओळख त्याचा मित्र शंतनू कुकडे (Shantanu Kukde) याच्यासोबत करून दिली. कुकडेने महिलेला पुण्यात घर मिळवून दिले, तसेच तिच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत केली. याच ओळखीचा फायदा घेत शंतनू कुकडे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. (Pune Crime News)

शंतनू कुकडे (Shantanu Kukade) याच्यावर काही दिवसांपूर्वी दोन तरुणींनी लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्या प्रकरणी गुन्हाही दाखल केला होता. आताच्या प्रकरणात पोलिसांनी शंतनू कुकडे आणि त्याच्या मित्रांना अटक केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.