आता चालता-चालता न्याहाळता येणार महालक्ष्मी रेसकोर्स!

महालक्ष्मी- वरळी मार्गावर सायकल ट्रॅक

78

महालक्ष्मी रेसकोर्स आजवर केवळ रेल्वे नजिकच्या पुलावरून पाहता येत होते. परंतु आता हे रेसकोर्स ई मोझेस मार्गावरूनही पाहता येणार आहे. महालक्ष्मी रेल्वे पुलाखालील भागापासून ते सेनापती बापट मार्गाला जोडणाऱ्या राखांगी चौकापर्यंतच्या परिसरातील रेसकोर्सची धोकादायक भिंत तोडून त्याठिकाणी रेलिंग बसवण्यात येणार आहे. हे रेलिंग बसवतानाच येथील पदपथाचीही सुधारणा केली जाणार आहे. तसेच येथील ५५० मीटरच्या परिसरात सायकल ट्रॅक बसवून महालक्ष्मी रेल्वे स्थानकापासून ते राखांगी चौक परिसरातील भागांचे नुतनीकरण करत एकप्रकारची या जागेचा होणारा गैरवापर टाळत येथील जळमटे काढली जाणार आहेत.

1 2

या कामासाठी १ कोटी २२ लाख खर्च केले जाणार

महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथील जया ऑटो सर्विस सेंटर ते राखांगी चौकपर्यतची महालक्ष्मी रेसकोर्सची संरक्षण भिंत ही धोकादायक अवस्थेत आहे. तसेच सद्यस्थितीत संरक्षण भिंतीस लागून असलेली रेसकोर्सची भिंत धोकादायक स्थितीत आहे. तसेच या संरक्षक भिंतीस लागून असलेल्या पदपथाची अवस्थाही दयनीय आहे. सध्या या पदपथाचा वापर अनधिकृत वाहन पार्किंग करण्यास तसेच भिकाऱ्यांचे वास्तव्य होते. त्यामुळे या परिसराचे सुशोभिकरण करून या पदपथाचा होणारा अनधिकृत वापर टाळण्याच्या दृष्टीकोनातून जी दक्षिण विभागाचे प्रभाग क्रमांक १९७ मधील या रेसकोर्सच्या धोकादायक सुरक्षक भिंतीचे व पदपथाचे नुतनीकरण करून या रस्त्यावर सायकल ट्रॅक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी वरळीला आदर्श मतदार संघ बनवण्याचा संकल्प केला आहे, सौंदर्यीकरणाच्या या या माध्यमातून या संकल्पात आणखी एक भर पडणार आहे. या कामासाठी १ कोटी २२ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. या कामासाठी पार्वती इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीची निवड करण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

(हेही वाचा – राम कृष्णहरी… म्हणत मोदींनी पंढरपूरात केलं पालखी मार्गाचं उद्घाटन)

आता रेसकोर्स न्याहाळता येणार

जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महालक्ष्मी पुलाच्या खालील भागापासून ते राखांगी चौकपर्यंत एकूण ५५० मीटर परिसर आहे. येथील महालक्ष्मी रेसकोर्सला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. मुंबईतील हे प्रसिध्द मनोरंजन केंद्र म्हणून ओळखले जाते. हे एकप्रकारे मुंबईचे वैभव असून या रेसकोर्सची भिंती धोकादायक स्थितीत आहे. ती भिंत पाडून त्याठिकाणी रेलिंग स्वरुपात संरक्षक भिंत असेल. तसेच येथील पदपथाचही सुधारणा केली जाणार आहे. यामाध्यमातून सरंक्षक भिंत आणि पदपथाचे नुतनीकरण करून हा परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. ज्यामुळे एकप्रकारे याठिकाणाहून रेसकोर्स न्याहाळता येईल,असे त्यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकापरिसरात पूर्णपणे सुशोभित होणार

तसेच या ५५० मीटर लांब आणि दोन मीटर रुंदीचे याच पट्टयात सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. ज्यामुळे येथील जनतेला सायकलिंग व जॉगिंगचीही सुविधा उपलब्ध होईल. महापालिकेने आधीच सातरस्ता चौकाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे, शिवाय महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसराचाही पट्टा सुधारीत केला जात आहे. त्यात आता या भागाचेही सुशोभिकरण केले जात असल्याने महालक्ष्मी रेल्वे स्थानकापरिसरात पूर्णपणे सुशोभित होईल,असा विश्वास शरद उघडे यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.