इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोल, डिझेलचे दर जवळपास २५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. यामुळे अनेकजण सीएनजी आणि इलेक्ट्रिकल वाहनांना पसंती देत आहेत. तर सामान्य लोकांवर वाहने सोडून सायकल वापरण्याची वेळ आली आहे.
( हेही वाचा : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यात पुन्हा आंदोलन )
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्याचे महत्त्व उमगलेले आहे. त्यामुळे विशेषतः महिला व लहान मुलांकडून सायकलची मागणी वाढली आहे. इलेक्ट्रिक सायकलचे फायदे अनेक असल्याने, सायकल खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत सायकलला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. सायकलच्या किमती वाढल्याने आता सायकलही परवडेनाशी झाली आहे. मागील वर्षभरात सायकलच्या किमतीत वीस ते तीस टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे गत वर्षभरात सर्वच प्रकारच्या सायकलच्या किमती वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढल्या आहेत.
सायकलची किंमत?
- साधी सायकल – ७ ते ८ हजार
- फॅन्सी सायकल – १५ ते १७ हजार
- गिअर सायकल – १२ हजार ५०० ते १५ हजार
- इलेक्ट्रिक सायकल – ३० ते १ लाख ३० हजार
- हायब्रीज सायकल – १० हजार ते २० हजार
- लहान मुलांची सायकल – ४ हजार ते ५ हजार