हमास हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. गाझामधील एका रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलवर मोठी टीका केली जात आहे. यामध्ये अमेरिकेने इस्रायलची बाजू घेतली आहे. (Israel-Hamas Conflict)
(हेही वाचा – Israel-Hamas Conflict : गाझामधील रुग्णालयावरील हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धक्का)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे की, गाझा पट्टीमधील अहली अरब रुग्णालयात झालेला स्फोट इस्रायलने केल्याचे दिसत नाही. ते इस्रायलची राजधानी तेल अवीव येथे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी बोलत होते.
बायडेन यांनी बेंजामिन नेतान्याहू यांना सांगितले की, गाझामधील एका रुग्णालयात काल झालेल्या स्फोटामुळे मला खूप दुःख झाले आहे. मी जे पाहिले आहे, त्याच्या आधारे असे दिसते की, हे काम तुम्ही केले नाही, तर दुसऱ्या गटाने केले आहे. इस्रायलच्या भेटीनंतर बायडेन यांनी जॉर्डनला भेट देण्याचे नियोजन केले होते, परंतु रुग्णालयातील स्फोटानंतर तेथील बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. (Israel-Hamas Conflict)
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, हमास गटाने सांगितले की, गाझामधील अल-अहली रुग्णालयात मंगळवारी झालेल्या भीषण स्फोटात शेकडो लोक ठार झाले. हमासने इस्रायली हवाई हल्ल्यामुळे स्फोट झाल्याचा आरोप केला, परंतु इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यात त्यांचा सहभाग नव्हता आणि हा स्फोट अयशस्वी झालेल्या पॅलेस्टिनी रॉकेटमुळे झाला होता. (Israel-Hamas Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community