फ्रान्सच्या बियरवर महालक्ष्मीचा फोटो; विनोद डिसुझांच्या विरोधानंतर कंपनीचा माफीनामा 

194

फ्रान्समधील बियाण मॅनजर या कंपनीने त्यांच्या बीयरवर महालक्ष्मीचा फोटो छापून हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करण्यात आले होते. मद्याला हिंदू देवीचा फोटो लावून फ्रान्समध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे समजल्यावर मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते विनोद डिसुझा यांनी तात्काळ याची दाखल घेत थेट फ्रान्सचे राष्ट्रपती आणि संबंधी कंपनीकडे या प्रकारचा विरोध दर्शवला. त्यानंतर कंपनीला उपरती आली आणि कंपनीने माफी मागून ही बियर बाजारातून मागे घेतली.

कंपनीने मागितली क्षमा 

फ्रान्समधील बियाण मॅनजर या कंपनीने मंदाला ऑरगॅनिक नावाची बियर बाजारात आणली, तिची ऑनलाईन विक्रीही सुरु केली. जेव्हा या यरच्या बाटलीवर महालक्ष्मीची छायाचित्र छापण्यात आले असल्याचे मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते विनोद डिसुझा यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी तात्काळ कंपनीच्या व्यवस्थापकांना ईमेल करून हा सगळा प्रकार लक्षात आणून दिला. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना तुम्ही दुखावत आहात असेही त्यांनी पत्राद्वारे जाणीव करून दिली. त्यानंतर डिसुझा यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती यांनाही पत्र लिहून याविषयी अवगत करून दिले. त्यानंतर फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी विनोद डिसुझा यांच्या पत्राची दखल घेत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकांनी पत्र लिहून ;आम्ही आपल्या पत्राची दखल घेतली आहे, आम्ही आमचे उत्पादन तात्काळ बाजारातून मागे घेत आहोत, घडल्या प्रकाराबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतो, तसेच असा प्रकार कसा घडला याचीही चौकशी करू,’ असे पत्र पाठवून क्षमा मागितली.

(हेही वाचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित आघाडीत वाद; प्रकाश आंबेडकरांना सुनावले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.