परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची मोठी घोषणा; ‘या’ रिक्षा चालकांना मिळणार १० हजार रुपयांचे अनुदान

61

परिवहन मंत्री प्रताप सरानाईक (Transport Minister Pratap Saranaik) यांनी रिक्षा चालकांसाठी (Rickshaw Driver Scheme) एक नवी योजना जाहीर केली आहे. 65 वर्षांहून अधिक वय असलेल्या रिक्षा चालकांसाठी दहा हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा मंत्री सरनाईक यांनी केली आहे. दरम्यान, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी आनंद दिघे महामंडळाच्या बैठक (Anand Dighe Corporation meeting) पार पडली त्यावेळी हे विधान मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. (Pratap Sarnaik)

प्रताप सरनाईक म्हणाले, ज्यावेळी शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या दिघे साहेबांच्या नावाने मंडळ स्थापन केलं होतं. आम्ही आता निर्णय घेतलाय की, 27 जानेवारी हा या महामंडळाचा वर्धापन दिन असेल. 50 कोटी रुपयांची तरतूद या महामंडळासाठी करण्यात आलेली आहे. ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ’, (Dharamveer Anand Dighe Maharashtra Auto-Rickshaw Meter Taxi Driver Welfare Corporation) असं त्याचं नाव असणार आहे. आम्ही लोगोचं प्रकाशन सुद्धा मार्च महिन्यात करणार आहोत. कारण आमचा परिवहन दिवस असतो, त्यादिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडेल. असे विधान सरनाईक यांनी केले. 

(हेही वाचा – PM Awas Yojana Urban 2.0 : शहरी गरीबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ची अंमलबजावणी सुरू )

प्रत्येक जिल्ह्यात याचा फायदा होईल

या महामंडळाचे ठाण्यात मुख्य कार्यालय असणार आहे. परिवहन मुख्य कार्यालयात भूमिपूजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होईल. राज्यातील एक लाखापेक्षा रिक्षा चालकांना याचा फायदा होईल. त्यांच्यासाठी वेगळी बँक निर्माण करण्याचा मानस आहे. याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात याचा फायदा होईल. मंडळाचे 500 रुपये भरून सभासद सदस्य होण्यासाठी भरावे लागतील. वर्षाला 300 रुपये फी देखील द्यावी लागेल. बोगस रिक्षा चालकांना कठोर कारवाई केली जाईल. सर्वांनी नोंदणी केली तर 67 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे येतील, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

(हेही वाचा – PM Awas Yojana Urban 2.0 : शहरी गरीबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ची अंमलबजावणी सुरू)

उत्कृष्ट चालक बक्षीस योजना

उत्कृष्ट रिक्षा/टॅक्सी चालक, उत्कृष्ट रिक्षा /टॅक्सी चालक संघटना तसेच उत्कृष्ट रिक्षा स्टॅन्ड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवली जाईल, असे परिवहनमंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनराव यांच्या इतर अधिकारी उपस्थित होते. कल्याणकारी मंडळाच्या सभासद चालकांना जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहेत. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाणार आहे.कर्तव्यवर असताना एखादा चालकात दुखापत झाल्यास त्याला या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.