प्रवासात मोठ्याने गाणी ऐकताय मग सावध रहा! उच्च न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय

84

तुमच्या आसपास स्वत:च्या मोबाईलवर जोरात गाणी ऐकणारी माणसे तुम्ही पाहिली असतीलच, स्वत:च्या मनोरंजनाखातर असे लोक दुस-यांच्या प्रवासांना त्रास देत असतात. त्यात जर अशी माणसे प्रवासात तुमच्यासोबत असतील तर, तुमचे डोक उठलेच म्हणून समजा. आता यावर कठोर पावले उचलत उच्च न्यायलयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

बसमधून उतरवले जाणार 

कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना, अशा लोकांना बसमधून उतरवण्याचा आदेश दिला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या बसमध्ये प्रवास करताना मोबाईलच्या स्पीकरवर जोरात गाणी वाजवणा-यांवर बंदी घातली आहे. जो प्रवासी असे कृत्य करेल, त्याला थेट बसमधून उतरवले जावे, असे उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने  एका याचिकेवर सुनावणी करताना, बसमध्ये मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणा-या आणि आपल्या इतर सहप्रवाशांना त्रास देणा-या प्रवाशाला संबंधित बसमधील अधिका-यांनी असे वर्तन करुन इतर प्रवाशांना त्रास न देण्याचे अपील करावे, असे सांगितले आहे. सोबतच जर तो प्रवासी अधिका-याचे ऐकत नसेल, तर त्या प्रवाशाला बसमधून खाली उतरवण्याचा अधिकार संबंधित अधिका-याला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

(हेही वाचा : तुम्ही वक्फ घोटाळा काढता, आम्ही मंदिर घोटाळा काढू! नवाब मलिकांची नवी खेळी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.