RTO चा वाहन चालकांसाठी मोठा निर्णय! आता नोंदणी विक्रेत्यांकडेच       

965
RTO चा वाहन चालकांसाठी मोठा निर्णय! आता नोंदणी विक्रेत्यांकडेच       
RTO चा वाहन चालकांसाठी मोठा निर्णय! आता नोंदणी विक्रेत्यांकडेच       

राज्य परिवहन (RTO) विभागाकडून चारचाकी वाहनचालकांसाठी एक नवी खुशखबर आली आहे. यामध्ये हलक्या व्यावसायिक वाहनांची नोंदणी (LMV Register in dealer) करण्यासाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. कारण या वाहनांच्या नोंदणीचे अधिकार राज्य परिवहन (आरटीओ) विभागाने परिपत्रक (rto circular) काढून ते वाहन विक्रेत्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील वाहन विक्रेते आता आरटीओकडे न जाता टुरिस्ट टॅक्सी (मीटर नसलेली), मालवाहू ऑटोरिक्षा, पिकअप आणि टेम्पो या हलक्या व्यावसायिक वाहनांची थेट नोंदणी करणार आहेत. (RTO)

आरटीओने नोंदणीचे अधिकार विक्रेत्यांना दिले असले तरी व्यावसायिक वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी दर दोन वर्षांनी आरटीओ कार्यालयात जाणे बंधनकारक असणार असल्याचे आरटीओने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – Vidhanasabha Elections 2024 : राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर; कोणती जागा राष्ट्रवादीला सुटली आणि कोण असेल उमेदवार ? घ्या जाणून)

नवी संगणक प्रणाली ‘वाहन ४.०’ 

राष्ट्रीय सूचना केंद्राने (NIC) नवीन पूर्ण बांधणी केलेल्या वाहनांच्या नोंदणीसाठी ‘वाहन ४.०’वर संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून वाहन विक्रेते हलक्या व्यावसायिक वाहनांची नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत राज्यातील डिलर्सना केवळ खासगी कार आणि दुचाकींची नोंदणी करण्याचा अधिकार होता. मीटर असलेल्या टॅक्सींची नोंदणीची जबाबदारी आरटीओकडेच राहील. (RTO)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.